कोकण

जि. प. सरस्वती विद्यामंदिरचे तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीत

CD

९४७१७

सरस्वती विद्यामंदिरच्या
तीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
रत्नागिरी, ता. ४ : पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल परीक्षा परिषदेने जाहीर केला. या परीक्षेत खानू येथील जि. प. सरस्वती विद्यामंदिर नं. १ या शाळेचे तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. शाळेचा निकालही १०० टक्के लागला. निधी श्रीराम मावळणकर हिने तालुक्यात पाचवा क्रमांक, अनूज संजय सोलकर याने सहावा आणि सोहम संतोष सुवारे याने बारावा क्रमांक मिळवला.
गेल्या चार वर्षांपासून प्रत्येक वर्षी या शाळेचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत येत आहेत. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ नासा/इस्रो, नवोदय, मंथन, तालुकास्तरीय तसेच जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा, शालेय परसबाग या सर्वच स्पर्धा परीक्षेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. तिच यशाची परंपरा शिष्यवृत्ती परीक्षेतही यावर्षीही कायम राखली आहे. या सर्व विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक विष्णू घोळवे, शिक्षक संजय शेलार, दत्तात्रय दरडी, करंबळेकर, मुख्याध्यापिका स्मिता जाधव यांचे अभिनंदन होत आहे. खानू केंद्राचे केंद्रप्रमुख गोविंद तारवे, झरेवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख विष्णू पवार, हातखंबा बीटचे विस्तार अधिकारी दत्तात्रय सोपनूर, तालुका गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे, ग्रामपंचायत खानू, शालेय व्यवस्थापन समिती खानू आदींनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Live-in Relationship : महिला लिव्ह-इन पार्टनरला पत्नी इतकाच अधिकार, दोषी पुरुषाला खावी लागणार जेलची हवा; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल

Amba Ghat Road Collapse : कोल्हापूर-रत्नागिरी प्रवासापूर्वी ही बातमी वाचा! आंबा घाट बंद झाल्यानंतर अणुस्कुरा मार्गावर काय घडतंय?

World Breastfeeding Week: जन्मानंतर लगेच एक तासात स्तनपान का सुरू करायचं असतं? तज्ज्ञांनी सांगितलं 'हे' मोठं कारण

व्यायाम करायला गेली आणि पोटावर धाडकन आपटली वनिता खरात; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणतात- आज पडलीस...

Latest Marathi News Live Update : प्रशांत किशोर यांची भक्कम आघाडी; 3 पैकी 2 जागांवर भाजपला फटका बसण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT