कोकण

विद्यार्थिनी अर्पिता सामंतचा भाजपतर्फे परुळेत सत्कार

CD

विद्यार्थिनी अर्पिता सामंतचा
भाजपतर्फे परुळेत सत्कार

सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. ४ ः अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे (ता. वेंगुर्ले) या प्रशालेची विद्यार्थिनी अर्पिता सामंत हिने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२४ च्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मुल्यांकनासाठी (फेरतपासणीसाठी) अर्ज केला होता. यात ३ गुण वाढल्याने तिचे एकूण गुण ५०० पैकी ५०० (१०० टक्के) झाले आहेत. फेरतपासणीनंतर तिचे शंभर टक्के गुण झाल्याने ती राज्यात प्रथम आली आहे. याबद्दल भाजपच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी शाल, पुष्पगुच्छ व रोख रकमेचे पारितोषिक देऊन सत्कार केला. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, माजी सभापती घनःश्याम उर्फ नीलेश सामंत, कुशेवाडा सरपंच नीलेश सामंत, परुळेबाजार उपसरपंच राजू दुधवडकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य वसंत तांडेल, सरपंच संघटनेचे विष्णू उर्फ पपू परब, माजी सरपंच प्रदीप प्रभू, बुथ प्रमुख गणपत माधव, ओबीसी सेलचे शरद मेस्त्री, सुधीर ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य सीमा सावंत, सुधीर पेडणेकर आदी उपस्थित होते.
94783

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

SCROLL FOR NEXT