कोकण

बॅंक ऑफ इंडियातर्फे कर्ज एनपीए करण्याचे आवाहन

CD

बॅंक ऑफ इंडियातर्फे कर्ज
एनपीए करण्याचे आवाहन
रत्नागिरी ः बँक ऑफ इंडियातर्फे सर्व शाखा-झोनमध्ये वनटाइम सेटलमेंट (ओटीएस) अंतर्गत कर्जदारांच्या एनपीए कर्जखात्यांची पूर्तता करण्यासाठी ११ जुलैला समझोता दिवसांचे आयोजन करण्यात आले आहे. समझोता दिवस विशेषत: अशा एनपीए कर्जदारांसाठी तयार करण्यात आला आहे. जे कर्जदाराच्या व्यवसायातील, वैद्यकीय स्थितीमुळे किंवा इतर कोणत्याही खऱ्या कारणामुळे कर्जाची वेळेत परतफेड करू शकले नाहीत. बँकेकडे लहान किमतीची खाती आणि मध्यम आकाराची खाती सेटल करण्यासाठी विशेष ओटीएस योजना आहेत ज्या द्वारे ज्या कर्जदारांची खाती एनपीए आहेत त्यांना विशेष आणि चांगल्या सवलती दिल्या जातात. ज्यांची खाती एनपीए आहेत त्यांनी येत्या गुरूवारी एनपीए कर्ज खाती सेटल करून या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन बॅंकेतर्फे सर्व कर्जदारांना केले आहे.

९४७३१
चवे -बौद्धवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप
रत्नागिरी ः समत्व ट्रस्ट ठाणे या संस्थेतर्फे तालुक्यातील शाळा चवे-बौद्धवाडीसह जिल्ह्यातील इतर ३३ शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना वर्षभर आवश्यकता असणारे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या साहित्यात १०० ते २०० पानी एकरेघी, दुरेघी, चौरेघी वह्या त्याचबरोबर रंगीत खडू बॉक्स, कंपासपेटी, चित्रकला वही याचा समावेश आहे. समत्व ट्रस्टचे विश्वस्त तथा मुख्य जनसंपर्क प्रमुख नरेंद्र खानविलकर, रत्नागिरी जिल्हा पोलिस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष पाटील, समत्व ट्रस्टचे सदस्य रवींद्र महाडिक, किसन सागवेकर, ओरीचे केंद्रप्रमुख प्रकाश कळंबटे यांच्या उपस्थितीत साहित्य वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lucknow Fire : लोक जळत होते, खिडकी फोडली अन् पाईपच्या साहाय्याने खाली उतरली... लखनऊ आगीतील युवतीची वेदनादायक कहाणी

Arabian Sea Monsoon : मॉन्सूनचे जोरदार आगमन!, मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटकात पावसाला सुरूवात; दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार

Lalan Singh: सहारनपूरच्या जंगलात मध्यरात्री सुरू झाला गोळीबार... पोलिसांनी ओळखला तोच कुख्यात ललन सिंह; काही मिनिटांत संपली वर्षांची दहशत

Latest Marathi News Live Update : वैजापूर तालुक्यातील तलवाडा घाटात ढगफुटीसदृश पाऊस; शिऊर बंगला-नांदगाव मार्गावरील पूल गेला वाहून

Ahilyanagar Crime: मित्रा कशाला वाद घालतो, भांडणात मध्यस्थीला गेला; ३२ वर्षीय तरुणाला १६ वर्षांच्या मुलानं संपवलं

SCROLL FOR NEXT