कोकण

जनआरोग्य योजना नवीन निर्णयानुसार सुरू

CD

जनआरोग्य योजना
नवीन निर्णयानुसार सुरू
रत्नागिरी, ता. ४ : आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना नवीन अंमलबजावणीनुसार १ जुलै २०२४ पासून चालू केली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी दिली.
या योजनेचे लाभार्थी सर्व रेशनकार्डधारक व आयुष्यमान भारत कार्डधारक असणार आहेत. महाराष्ट्रातील कोणतेही रेशनकार्ड, आयुष्यमान भारतकार्ड, ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड ), रेशनकार्ड नसल्यास तहसीलदारांचे प्रमाणपत्र, रस्ता अपघातग्रस्तांसाठी ज्या जिल्ह्यामध्ये लाभ घेणार आहे त्या जिल्ह्यातील एमएलसी ओळखपत्र, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील रेशनकार्ड, ओळखपत्र, आयुष्यमान कार्ड अशी कागदपत्रे लागणार आहेत. या योजनेंतर्गत एकूण १३५६ आजारांवर मोफत उपचार, त्यापैकी ११९ शासकीय रुग्णालयास राखीव, रस्ता अपघातग्रस्त रुग्णास प्रतिवर्षी १ लाखापर्यंत मोफत उपचार करण्यात येणार आहेत. नवीन अंमलबजावणीबाबत ३० जूनला सर्व रुग्णालयास राज्य व जिल्हास्तरावरून सूचना देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! पाच नवीन पोलीस स्टेशन उभारण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी; पण कोणत्या परिसरात होणार?

Ravichandran Ashwin: अश्विनची मोठी भविष्यवाणी! ‘हा’ खेळाडू जिंकणार ऑरेंज कॅप; म्हणाला 'जर त्याला ओपनिंगला...'

Prioritize Fuel : आंबा-काजू बागायतदारांना प्राधान्याने पेट्रोल-डिझेल द्या; महेश सप्रे यांचे तहसीलदारांना निवेदन

Sweat Energy : बॅटरी-चार्जरचं टेन्शन संपलं! शरीराच्या घामातून तयार होणार वीज; फक्त हातावर चिटकवा 'हे' स्टिकर अन् चार्जिंग फूल

‘सुपर डुपर’मधून अहिराणी सुपर सिंगर अंशुमन मोरे महाराष्ट्रभर झळकला ! पहिल्याच गाण्यातून जिंकली प्रेक्षकांची मनं

SCROLL FOR NEXT