कोकण

...अन्यथा ‘परिवहन’ विरोधात आंदोलन

CD

...अन्यथा ‘परिवहन’ विरोधात आंदोलन

परशुराम उपरकर ः विविध समस्यांबाबत अधिकाऱ्यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ ः परिवहन कार्यालयात मेपासून झालेल्या दोन बैठकांमध्ये मांडलेल्या समस्यांबाबत प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही न झाल्यास ५ ऑगस्टला आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांना दिला. यावेळी उपरकर यांनी विविध मुद्यांबाबत काळे यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. शिवाय मागण्यांचे निवेदनही दिले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा उपरकर समर्थक आशिष सुभेदार, आप्पा मांजरेकर, राजेश टंगसाळी, सिंधुदुर्ग ड्रायव्हर असोसिएशनचे अध्यक्ष विजय जांभळे, आबा चिपकर, मंदार नाईक, संदेश सावंत, संतोष सावंत, गिरगोल दिया, प्रमोद गावडे, शाईबाज रसांगी, भक्तिश कावळे, हेमंत कांबळी, सिध्देश भट, अभय मयेकर, देविदास सातार्डेकर, अशपाक करोल, पंकज देसाई, नितीन कांबळे, प्रकाश साटेलकर, नंदू परब आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, प्रवासी वाहतूक परवाना घेऊन बसमालकांकडून सामान ठेवण्याच्या डिकीतून व टपवरून वाहतूक केली जाते. विना बिल तसेच जीएसटी चुकवून माल वाहतूक केली जाते. काही बसमधून अमली पदार्थ तसेच गोवा बनावटीची दारू, सोन्याच्या मौल्यवान वस्तूंचीही तस्करी केली जाते; मात्र पोलिस यंत्रणेला माहिती देऊनही कोणतीही कारवाई केली जात नाही. दिवाळी, गणेश चतुर्थी व मेमध्ये तसेच अन्य सुटी सणांच्या काळात महाराष्ट्र शासन परिवहन कायदे अंतर्गत प्रवासी वाहतूक एसटी भाड्याच्या दुप्पट आकारणी करावी, असा निर्णय झालेला असताना बसमालक ॲपवरून दीडपटीपेक्षा जास्त आकारणी करतात. त्यामुळे कोकणातील प्रवाशांना मोठा भुर्दंड पडत आहे. काही वाहतूक बसचे पासिंग झालेले नाही किंवा विमा काढलेला नसतो. एक परवाना आठ दिवस ते महिनाभर वापरला जातो. त्यामुळे बसचा अपघात झाल्यास प्रवाशांना कोणताही विमा फायदा मिळत नाही. गोवा, कर्नाटक राज्यांच्या सीमेवर सीसीटीव्ही बसविण्याची मागणी करण्यात आली; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ओव्हरलोड वाळू वाहतुकीबाबत कोणती कारवाई केली जात नाही. अनेक परप्रांतीय चालक अमली पदार्थ किंवा मद्यपान करून वाहने हाकतात. रस्त्यावर माती साचून किंवा पुलावर पाणी साचून चालकाला अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागतो, अशा अनेक समस्या उपरकर यांनी यावेळी उपस्थित करून जाब विचारला. याबाबत तातडीने कारवाई न केल्यास ५ ऑगस्टला तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा माजी आमदार उपरकर व समर्थकांनी काळे यांना दिला.
94828

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Bhoom Crime : भूममध्ये कत्तलीसाठी जाणारी १६ जणावरे पकडली, आठ लाखाचा मुद्देमाल जप्त

Lungs Health Tips: थोडं चाललं तरी धाप लागते? श्वास घेताना त्रास होतोय? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले ५ सोपे घरगुती उपाय!

Bike Accident : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; १ जण ठार, तर ३ जण जखमी

SCROLL FOR NEXT