कोकण

६० पैकी ५ धोकादायक झाडे हटवली

CD

६० पैकी ५ धोकादायक झाडे हटवली

इन्सुली घाटीतील स्थिती; उर्वरित झाडे तोडण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ४ ः जुन्या मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली घाटीतील धोकादायक झाडे तोडण्याची मागणी गेली कित्येक वर्षे होत आहे. यात धोकादायक झाडांचा सर्व्हे सुद्धा वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने केला होता. त्यात ६० हुन अधिक झाडे धोकादायक असल्याचा अहवाल बनवला होता; मात्र यावर्षी पावसाळ्यात केवळ पाच झाडे वनविभागाकडून तोडण्यात आली. केवळ पाचच झाडे तोडल्याने स्थानिक ग्रामस्थ व वाहनधारकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
जुन्या महामार्गावरील इन्सुली घाटीतून कोल्हापूरमार्गे मुंबई-पुणे जाणारी मोठी वाहतूक होत असते. वादळी वाऱ्यासह पाऊस काही काळ झाल्यास येथील घाटात झाड कोसळून वाहतूक बंद होण्याचे प्रकार दरवर्षी होत असतात. वेळोवेळी अशा घटना घडूनही संबंधित विभाग मात्र धोकादायक झाडे हटवित नसल्याने ग्रामस्थांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे.
इन्सुली येथील सामाजिक कार्यकर्ते सूर्या पालव यांनी संबंधित दोन्ही विभागांसोबत पत्रव्यवहार करून धोकादायक झाडांबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी काही वर्षांपूर्वी केली होती. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम आणि वनविभागाने सर्व्हे करून तब्बल ६० हुन अधिक झाडे धोकादायक असल्याचा अहवाल तयार केला होता; मात्र कोणतीही ठोस उपाययोजना केली नव्हती. दरम्यान, उशिरा का होईना, वनविभागाला जाग आली असून, त्यांनी बुधवारी (ता. ३) या घाटीतील ५ झाडे तोडून बाजूला केली. त्यामुळे वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे; मात्र उर्वरित धोकादायक झाडे कधी तोडणार, असा सवालही उपस्थित होत आहे.
94827

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांनो सावधान! PM Kisanचा 24वा हप्ता येण्याआधी ‘ही’ एक गोष्ट तपासा, नाहीतर लाभापासून मुकाल

Pune News: यंदा कार्तिकी वारीत गटारात तीर्थस्नान! मृत माशांचा खच अन् दुर्गंधीयुक्त सांडपाणी; कार्तिकी वारीपूर्वी इंद्रायणीची अवस्था चिंताजनक

Sangli Crime : ईश्वरपूर हादरले! लॉजवर नेऊन शीतपेयातून दारू पाजून महाविद्यालयीन तरुणीवर दोघांकडून जबरदस्तीने बलात्कार; मारहाण करत जिवे मारण्याचीही धमकी

Latest Marathi News Live Update : पुण्यात शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कुणाकडे? २४ नोव्हेंबरला होणार फैसला!

Highway Accident: महामार्गांवरील भीषण अपघातांना बसणार वेसण; अकराशे पोलिसांची २४ तास गस्त, नाशिकसह २५ जिल्ह्यांतील यंत्रणा सक्रिय

SCROLL FOR NEXT