कोकण

वेश्‍या व्यवसाय

CD

दापोली बाजारपेठेत अनैतिक व्यवसायावर छापा
दोन संशयित ताब्यात ः बनावट गिऱ्हाईक पाठवून कारवाई
दापोली, ता. ४ ः दापोली बाजारपेठेतील एका लॉजमध्ये अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज दुपारी सव्वा तीनच्या सुमारास छापा टाकला. यामध्ये दोन संशयिताना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका लॉजमध्ये देहविक्री व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांच्या पथकाने तेथे धाव घेतली. त्या अगोदर एका पंटरला गिऱ्हाईक म्हणून या लॉजमध्ये पाठवले. या पंटरने या लॉजमध्ये असलेल्या एका व्यक्तीला दोन हजार रुपये दिले. लॉजमधील खोली क्रमांक तीनमध्ये एक महिला बसली होती. त्यानंतर पंचांसमक्ष या व्यक्तीची झडती घेतली असता पंटरने दिलेले दोन हजार रुपये या व्यक्तीच्या खिशात सापडले. ही व्यक्ती या सर्व व्यवहारात मध्यस्थ म्हणून काम करत होता. व्यवसाय करणारी महिला स्थानिक आहे. या पथकाने या दोन्ही संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या छाप्यात अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक विभागाच्या उपनिरीक्षक गायत्री पाटील, हेड कॉन्स्टेबल सांची सावंत, सुभाष भागणे, नितीन डोमणे, शांताराम झोरे तर दापोलीचे पोलिस निरीक्षक विवेक अहिरे उपनिरीक्षक यादव, गंगधर, चव्हाण सहभागी झाले होते. या घटनेचा अधिक तपास दापोलीचे पोलिस निरीक्षक विवेक अहिरे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT