कोकण

कुडाळ येथील सीए, डॉक्टर्सना रवळनाथ फायनान्सतर्फे शुभेच्छा

CD

९४९१९

कुडाळ येथील सीए, डॉक्टर्सना
रवळनाथ फायनान्सतर्फे शुभेच्छा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ५ ः रुग्णसेवा ही ईश्वर सेवा मानून अहोरात्र रुग्णांची सेवा निष्ठेने करणारे डॉक्टर्स व देशाच्या आर्थिक विकास व हितासाठी आर्थिक अखंडता, पारदर्शकतेने सेवा करणारे चार्टर्ड अकौंटंट यांचे आजच्या युगात खूप मोलाचे योगदान आहे. ‘डॉक्टर्स डे’ व ‘चार्टर्ड अकौंटंट (सीए) डे’ च्या निमित्ताने त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटी लि. आजरा (मल्टिस्टेट) प्रधान कार्यालय, गडहिंग्लज या संस्थेतर्फे
येथील सर्व लहान-मोठ्या रुग्णालयात समक्ष भेटून सर्व डॉक्टर्सना आणि चार्टर्ड अकौंटंट यांना शुभेच्छापत्रे, गुलाबपुष्प देऊन त्यांच्या अविरत रुग्णसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
संस्थेतर्फे आजरा, गडहिंग्लज, चंदगड, नेसरी, कोल्हापूर, जयसिंगपूर, बेळगाव, निपाणी, कुडाळ, सांगली, पुणे आणि कराड शहर व परिसरातील डॉक्टरांनाही शुभेच्छा देण्यात आल्या. ‘रवळनाथ’ चे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले व संचालक, शाखा सल्लागार यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली संस्थेच्या महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यातील संस्थेच्या कार्यक्षेत्रात हा उपक्रम राबविण्यात आला. रवळनाथचे सीईओ डी. के. मायदेव, नेसरी शाखा चेअरमन प्राचार्य आर. बी. पाटील, चंदगड शाखा चेअरमन सौ. पुष्पा नेसरीकर, शाखा सल्लागार प्रा. डॉ. आर. एन. साळुंखे, जयसिंगपूर शाखा सल्लागार प्रा. माणिक घुमाई, सहा. वसुली अधिकारी अशोक सुळकुडे, जनसंपर्क अधिकारी बाबासो मार्तंड, शाखाधिकारी सागर माने, सुशांत जिजगोंडा, बसवराज चौगुले, दीपक शिंदे, उत्तम दळवी, किरण कोडोळी, पंकज कुंभार, किरण शहा, विक्रम जांभेकर, अमोल शिके, सुमेध देशपांडे तसेच शिवानंद काळे, नितीन घोटणे व सहकाऱ्यांनी संस्था कार्यक्षेत्र परिसरातील सर्व लहान-मोठ्या रुग्णालयात समक्ष भेटून सर्व डॉक्टर्सना आणि चार्टर्ड अकौंटंट यांना शुभेच्छापत्र, गुलाबपुष्प देऊन त्यांच्या अविरत रुग्णसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 3rd ODI: २-० ने मालिका जिंकली अन् आता टीम इंडियात होणार मोठा फेरबदल? तिसऱ्या वनडेत ‘या’ स्टार्सची एन्ट्री, कोण होणार OUT?

Pune News : पुण्यात २२ तासांत १२३ मुलींचे अपहरण झाल्याचा दावा खोटा; सोशल मीडियावरील ती ‘रील’ निराधार, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

Latest Marathi News Live Update : भारताच्या लेकींनी रचला इतिहास! चीनचा पराभव, ४४ वर्षांनंतर हॉकीत सूवर्णपदक

Custard Apple Season : धारूरचा हंगाम संकटात! दुष्काळाने सीताफळाचा गोडवा हिरावला; मजुरांच्या रोजगारावर होणार परिणाम

Aundha Nagnath Temple : औंढा नागनाथ मंदिर भाविकांसाठी महिनाभर बंद; नित्यपूजा मात्र सुरू राहणार

SCROLL FOR NEXT