कोकण

वालावलकर रुग्णालयात मूळव्याध स्तनाचे आजार डायबिटीस फूट शिबिर

CD

वालावलकरमध्ये १२पासून विशेष शिबिर

मूळव्याध, स्तनाचे आजारांची होणार तपासणी

सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. ५ : वालावलकर रुग्णालय कासारवाडी सावर्डेत १२ व १३ जुलैला विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. यामध्ये मूळव्याध, स्त्रियातील स्तनाचे आजार, पोटाचे आजार तसेच डायबेटिक फूट आजार इत्यादींचे तज्ञ डॉ. नेहा गोडबोले बाह्यरुग्ण विभागात उपलब्ध आहेत.

पुण्यातील नामवंत शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. गोडबोले या स्वतः रुग्णांची तपासणी करणार आहेत. मूळव्याध, स्त्रियांच्यातील स्तनाचे आजार, दुर्बिणीद्वारे पोटांच्या विकारावरील शस्त्रक्रिया तसेच डायबेटिक फूट यात त्यांचा हातखंडा आहे. बऱ्याचदा चमचमीत, मसालेदार, मांसाहारी पदार्थ सेवन केल्यामुळे मूळव्याध हा आजार जडतो. त्यामुळे गु्द्द्वाराच्या जवळ फोड येणे व तो फुटून त्याच्यातून पाणी किंवा पू येणे, शौचाला गेल्यावर दुखणे, रक्त पडणे अशी लक्षणे दिसून येतात. अशा रुग्णाची एमआरआयद्वारे तपासणी करून तो मूळव्याध किती खोल आहे त्याची तपासणी वालावलकर रुग्णालयात करता येते तसेच कमी दरात एमआरआय चाचणी वालावलकर रुग्णालयात उपलब्ध करण्यात आलेली आहे. डॉ. गोडबोले या मूळव्याधवरती लेझरद्वारे उपचार करतात. लेझरद्वारे उपचारपद्धती ही अतिशय आधुनिक व उच्च दर्जाची उपचारपद्धती आहे. त्यामुळे रुग्णाला उपचारपद्धतीचा कमीत कमी त्रास होतो.

डॉ. गोडबोले या स्त्रियातील स्तनातील पाण्याच्या गाठी उदा. फ्रायब्रोएडीनोमायोसिस अशा विकरांवरही शस्त्रक्रिया व उपचार करतात. डायबिटिसमुळे पायातील रक्तवाहिन्यांमध्ये मेदाचे ब्लॉकेज निर्माण होऊन पाय बधीर होणे, जखमा होणे अशी गोष्टी घडतात अशा जखमा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे दीर्घकालीन राहतात तसेच अशा आजारांचे प्रमाण वाढत आहे. यालाच डायबेटिक फूट असे म्हणतात. अशा डायबेटिक फूटवरती शस्त्रक्रिया व उपचार करण्यातही डॉ. गोडबोले यांचा हातखंडा आहे. डॉ. गोडबोले या लेप्रोस्कोपिक दुर्बिणीद्वारे पित्ताशयातील खडे, अपेंडिक्स, हॅर्निया इत्यादींवर शस्त्रक्रिया करतात. त्या १२ व १३ जुलैला वालावलकर रुग्णालयात उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Bushra Bano IPS? : 'अस्सलाम-अलैकुम' म्हटल्यामुळे IPS अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली? बंगालमधील 'त्या' व्हिडिओवरून गदारोळ

Fact Check : विराट कोहली २०२७ चा वन डे वर्ल्ड कप इंग्लंडसाठी खेळणार? भारतीय क्रिकेटला हादरवून टाकणाऱ्या वृत्तामागचे सत्य

Tata News: चंद्रशेखरन यांचा U-Turn? पुन्हा Tata चेअरमनपदी निवड! निर्णय होताच शेअर्स 5% वाढले; नेमकं काय घडलं?

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीमवर दुःखाचा डोंगर; लेखकाचं अकस्मात निधन, सचिन गोस्वामींची भावुक श्रद्धांजली

UPI MDR 2026 : अमेरिकेच्या दबावामुळे युपीआय वर एमडीआर? केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण; जाणून घ्या नेमकं प्रकरण

SCROLL FOR NEXT