कोकण

वेंगुर्ले क्रिडा संकुलात लवकरच अद्यावत सुविधा

CD

swt59.jpg
M94967
मुंबईः क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांना निवेदन सादर करताना जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर.

वेंगुर्ले क्रिडा संकुलात अद्यावत सुविधा
क्रिडामंत्र्यांकडून हिरवा कंदीलः सचिन वालावलकर यांच्या मागणीला यश
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ५ः येथील तालुका क्रिडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अद्यावत सुविधा मिळाव्यात, अशी मागणी जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांनी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्याकडे केली होती. मंत्री केसरकर यांनी याबाबत क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार या कामाची तात्काळ मंजुरीबाबत कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश क्रीडा मंत्री बनसोडे यांनी दिले आहेत.
येथील तालुका क्रीडा संकुल येथे अद्यावत सुविधा निर्माण करणे यात ४०० मीटर सिंथेटीक धाव मार्ग व फुटबॉल मैदान, बैठक व्यवस्था कारण्याकरिता निधी मंजूर करुन मिळण्याबाबत श्री. वालावलकर यांनी मंत्री केसरकर यांना निवेदन दिले होते. यात त्यांनी म्हटले होते की, तालुका क्रिडा संकुल वेंगुर्लाकरिता ११.८६ एकर एवढी जागा प्राप्त असून आपल्या प्रयत्नातून या क्रीडा संकुलाकरीता ४ एप्रिल २०१६ च्या प्रशासकीय मान्यतेने १ कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यातून याठिकाणी भव्य अशी प्रशासकीय इमारत, बहुउद्देशीय हॉल, ४०० मीटर धावण मार्ग, विविध खेळाची मैदाने इत्यादी सुविधा पूर्ण झालेल्या आहेत. या क्रिडा संकुलातून या भागातील खेळाडू व नागरीक त्याचा लाभ मोठ्या प्रमाणावर घेत आहेत. दरम्यान अजूनही या तालुका क्रिडा संकुलामध्ये ४०० मीटर सिंथेटीक धाव मार्ग, फुटबॉल मैदान बैठक व्यवस्थेसह आंतरराष्ट्रीय दर्जाची अद्यावत सुविधा निर्माण झाल्यास त्याचा लाभ तालुक्यासह जिल्ह्यातील खेळाडूंना होईल. तसेच या क्रिडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धाही घेता येणार असून त्याद्वारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होण्यासही मदत होणार आहे. तरी या कामासाठी निधी मंजूर करुन मिळावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती.
यानुसार या कामासाठी सुमारे १२ कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात यावा, असे निवेदन मंत्री केसरकर यांनी मंत्री बनसोडे यांना दिले होते. या कामाच्या तात्काळ मंजुरीबाबत कार्यवाही करण्यात यावी, असे मंत्री बनसोडे यांनी दिले आहेत. यामुळे आता वेंगुर्ला स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा पुढील काळात उपलब्ध होणार असुन याचा मोठा फायदा तालुक्यासहित जिल्ह्यातील खेळाडूंना होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

सुरू होऊन ८ महिने नाही झाले तोच निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका? मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चेला उधाण

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

Tata Sons Boardroom: बोर्डरूममध्ये टाटा सन्सचे ‘बंड’; सूत्रे पुन्हा चंद्रशेखरन यांच्याकडे, नोएल टाटांची नाराजी कायम

Agriculture Corruption: कृषी खात्यामध्ये भ्रष्टाचाराचे उदंड ‘पीक’; राज्यात १६५ अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT