कोकण

काजू उत्पादकांना भरपाई द्यायची आहे की नाही0

CD

९४९७४

काजू उत्पादकांना भरपाईची प्रतिक्षाच
अण्णा केसरकर ः विमा कंपनीस अपीलाची मुभा दिल्याने नाराजी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ ः आंबोली मंडळाच्या हवामान केंद्राच्या नोंदीनुसार माडखोल मंडळातील नऊ गावातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शेतकरी संघटनेतर्फे गेली वर्षभर लढा सुरू आहे. कृषी विभागाच्या राज्यस्तरीय बैठकीत काजू उत्पादक शेतकऱ्यांना संबंधित कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश देण्यात आले. परंतु, हे आदेश देताना बैठकीत विमा कंपनीला अपील करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे शासनाला शेतकऱ्यांना भरपाई द्यायची आहे की नाही, अशी शंका येत आहे. या कंपन्यांचे, अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्यामुळे असे प्रकार होत आहेत. याला लोक लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत, असा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वसंत केसरकर यांनी केला.
श्री. केसरकर म्हणाले, "माडखोल महसूल मंडळातील नऊ गावातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना २०२२-२३ मध्ये पिक विम्याची नुकसान भरपाई रक्कम मिळाली नव्हती. माडखोल मंडळ सावंतवाडी मंडळाशी जोडले गेले. परंतु, माडखोल मंडळ हे आंबोली मंडळाशी जवळ आहे. आंबोली आणि माडखोल मंडळातील हवामानात झालेल्या बदलाचा काजू उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला. परंतु, माडखोल मंडळ सावंतवाडी मंडळाशी जोडले गेल्यामुळे या केंद्रातील हवामान नोंदी आंबोली मंडळातील मंडळातील हवामान नोंदीशी अलग होत्या. त्यामुळे काजू उत्पादक शेतकरी सुमारे नऊ कोटी रुपये पीक विम्यापासून वंचित राहिले. यासंदर्भात मी आवाज उठवला. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबरोबर चर्चा झाली. त्यात माडखोल मंडळाची गावे आंबोली मंडळाला जोडण्याचे आदेश देण्यात आले. तसेच आंबोली मंडळातील हवामान नोंदीनुसार काजू उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश देण्यात आले. त्यानुसार जिल्हास्तरीय बैठकीत शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा निर्णय झाला. याबाबत विभाग स्तरावर मार्गदर्शन मागवण्यात आले. परंतु, लोकसभा निवडणुक आचारसंहितेमुळे विभागस्थरीय बैठक होत नव्हती. २२ एप्रिलला ती बैठक झाली. त्यात शेतकऱ्यांना पिक विमा भरपाई देण्याचे आदेश झाले. परंतु, हे आदेश देतानाच संबंधित कंपनीला अपील करण्याची सवलत देण्यात आली. शासनाने कंपन्यांना सर्वच उपक्रम देऊन टाकले आहेत. कंपन्यांच्या हातात आता कारभार शासनाने दिलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा भरताना विचार केला पाहिजे. अपील करण्याची मुभा देऊन एक प्रकारे हे सिद्ध केले आहे की शासनाला शेतकऱ्यांना विमा द्यायचे आहे की नाही, हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे तसा निर्णय होत आहे. कंपनीचे आणि अधिकाऱ्यांचे साटेलोटे आहेत की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. हाच प्रकार वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण, कुडाळ तालुक्यातील भडगाव मंडळाबाबत घडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Transfer: मोठी बातमी! पोलीस विभागात महत्त्वाचा फेरबदल; चार आयपीएस आणि दोन राज्य पोलीस अधिकाऱ्यांची बदली, कारण काय?

Viral Video : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकताच, शिवम दुबे ट्रेनने तातडीने मुंबईसाठी रवाना का झाला? भारतीय खेळाडूने सांगितलं कारण...

IPL 2026 : इशान किशन कर्णधार, अभिषेक शर्माकडे उप कर्णधारपद... संघात खांदेपालट... आणखी एक अचंबित करणारा निर्णय

Latest Marathi News Live Update : पंढरपूर येथील सांगोला पेपर चोरी प्रकरण; दोन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

मुंबईत टँकरमाफियांचा हैदोस, अडीच हजाराच्या टँकरची १० हजारांना विक्री; पालिकेत विरोधक आक्रमक

SCROLL FOR NEXT