कोकण

लाडकी बहीण योजना गावागावात पोहचवा

CD

rat५p१०.jpg -
२४M९४९१५
राजापूर ः भाजप कार्यकारिणी बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष राजेश सावंत.

लाडकी बहीण योजना सर्वत्र पोहचवा

राजेश सावंत ः तालुका कार्यकारिणीची बैठक

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ५ ः आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता भाजप संघटन अधिक बळकट करायची आहे. त्यासाठी बूथ सक्षमीकरण करून या बूथच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गावा व वाडीवस्तीवर पोहचवा, असे आवाहन भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केले.
भाजपच्या संपर्क कार्यालयामध्ये राजापूर तालुका कार्यकारिणीची बैठक झाली. या वेळी सावंत यांनी संघटनात्मक आढावा घेत मार्गदर्शन केले. तशी माहिती भाजपाचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर यांनी दिली. या बैठकीचे नियोजन नागरेकर यांनी केले होते. या बैठकीला पक्ष निरीक्षक डॉ. निमणकर यांसह भाजप महिला आघाडीच्या उल्का विश्वासराव, भाजप प्रदेश ओबीसी सेलचे सरचिटणीस अनिलकुमार करंगुटकर, भाजप जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, जिल्हा उपाध्यक्ष अभिजित गुरव, राजापूर पश्चिम मंडल तालुकाध्यक्ष सुरेश गुरव, पूर्व मंडल तालुकाध्यक्ष भास्कर सुतार, महिला आघाडी अध्यक्षा सुयोगा जठार, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावंत म्हणाले, आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता भाजप संघटन मजबूत करण्याची गरज आहे. यासाठी नवीन बूथ, शक्तीकेंद्र रचना कराव्यात. नवीन मतदार नोंदणी मोहीम राबवावी. भाजपा बूथ कमिटीच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गाव व वाडीवस्तीवर पोहचवा. यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे उपलब्ध करण्यासाठी मदत करा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. तालुक्यातील विकासात्मक कामांचाही आढावा घेतला तर लोकसभा व पदवीधर मतदार संघ निवडणुकीत चांगले काम केल्याबद्दल भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. भाजप नेते माजी खासदार नीलेश राणे उपस्थित राहणार होते; परंतु ते मुंबईत एका तातडीच्या बैठकीला उपस्थित राहावे लागल्याने उपस्थित राहू शकले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मुश्रीफ साहेब, मला माफ करा.! अजितदादा होते तो ये नौबत नही आती..! भैया मानेंचे पत्र

Electric Shock Farmer: दुष्काळात भातपीक वाचवण्याची धडपड ठरली जीवघेणी; शेतात पाणी देताना वीजप्रवाहाच्या संपर्कात येऊन शेतकऱ्याचा मृत्यू

Horoscope 2027: २०२७ ठरणार खास! नोकरी, व्यवसाय अन् पैशांच्या बाबतीत मिळू शकतात मोठ्या संधी; ‘या’ ३ राशींचं नशीब चमकणार म्हणे

Sunetra Pawar: ‘स्वतःच्या कर्तृत्वावर निवडणूक लढवा, अजितदादांचं नाव वापरू नका’; सुनेत्रा पवारांचा विरोधकांना टोला

Maharashtra Monsoon Withdrawal : निम्म्या राज्यातून परतला पाऊस! मॉन्सूनच्या माघारीस पोषक स्थिती असल्याने प्रवास वेगाने सुरू, जाणून घ्या तुमच्या भागातील स्थिती

SCROLL FOR NEXT