कोकण

रेणुका प्रतिष्ठानने नोंदवला निषेध

CD

rat५p१३.jpg-
P२४M९४९२२
रत्नागिरी : महिलांवरील अत्याचाराविरोधात रेणुका प्रतिष्ठानतर्फे निवेदन देताना महिला कार्यकर्त्या.
----------------

महिला अत्याचाराचा निषेध

रेणुका प्रतिष्ठातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : पश्चिम बंगालमध्ये महिलांवरील वाढते अत्याचार व भारतात अनेक ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध निषेध नोंदवत रेणुका प्रतिष्ठानने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
निषेध नोंद करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात महिला आल्या. पाऊस असल्याने तेथील मंदिरात एक भजन म्हटले. त्यानंतर आवाराच्या बाहेर घोषणा देण्यात आल्या. अप्पर जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याकडे रेणुका प्रतिष्ठानतर्फे निवेदन देण्यात आले. हे निवेदन केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे पोहोचवण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. यानंतर ॲड. रूची महाजनी यांनी उपस्थित महिलांना संबोधित केले. आपल्या देशातील काही राज्यात महिलांची वाढती असुरक्षितता हा खूप गंभीर विषय आहे. तेथील शासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे. आपण जर सजग राहिलो नाही तर पश्चिम बंगालमध्ये घडणाऱ्‍या घटना आपल्यापर्यंत यायला वेळ लागणार नाही. म्हणूनच महिलांनी संघटित होणे गरजेचे आहे. एकत्र जमावाने एखाद्या गोष्टीला विरोध केला की नक्कीच त्याचा परिणाम जाणवतो, हे लक्षात घेतले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

८० लाख पॅकेजची नोकरी AIमुळे गेली, IT इंजिनिअर पतीने आयुष्य संपवलं; शेवटची चिठ्ठी वाचून पत्नीनेही १८व्या मजल्यावरून मारली उडी

Kurla Accident: कुर्ला बस दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट, आरोपी बेस्ट बसचालकला अखेर जामीन; हायकोर्टाचा निर्णय

Team India Schedule: भारतीय संघ व्यस्तच राहणार...! इंग्लंड दौऱ्यानंतर या देशात टी२० मालिका खेळणार; BCCI कडून घोषणा

IPL 2026 Marathi News: वैभव सूर्यवंशीला ९ कोटींचा फटका... राजस्थान रॉयल्सच्या 'Deal' शी आहे कनेक्शन; जाणून घ्या सर्व प्रकरण

"दारूमुळे माझं पहिलं लग्न मोडलं" जावेद अख्तरांची कबुली ; "मी एका वेळेला 18 बियर.."

SCROLL FOR NEXT