कोकण

सायबर पोलिस ठाण्याची भेट

CD

rat५p१८.jpg-
२४M९४९३६
रत्नागिरी : सायबर पोलिस ठाण्याला भेट देणारे गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थी. या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देताना सायबर पोलिस.

सायबर पोलिस ठाण्याला
गोगटेच्या विद्यार्थ्यांची भेट

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : सायबर जागरूकता दिवसाचे औचित्य साधून गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील संगणकशास्त्र आणि आयटी विभागातील २० विद्यार्थ्यांनी रत्नागिरी येथील सायबर पोलिस ठाण्याला भेट दिली. विद्यार्थ्यांनी तिथे गेल्यानंतर सायबर जगतात कोणकोणते गुन्हे आहेत त्याबद्दलची माहिती घेतली.
क्विक हील फाउंडेशन (पुणे) आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालय यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे. त्या कराराअंतर्गत हे सर्व विद्यार्थी रत्नागिरी जिल्ह्यामधील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या अभियानाअंतर्गत सायबर जागरूकतेबद्दल प्रशिक्षण देणार आहेत. त्याकरिता सुरवात म्हणून विद्यार्थी सायबर पोलिस ठाण्याकडे माहिती घेण्यासाठी गेले. या अभियानासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिसदलातर्फे पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या अधिपत्याखाली सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमित यादव, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पुरळकर, पोलिस हवालदार रामचंद्र वडार, पोलिस हवालदार निशा केळकर, पोलिस हवालदार श्रीया साळवी यांनी याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, शास्त्रशाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, संगणकशास्त्र आणि आयटी विभागाच्या समन्वयक प्रा. अनुजा घारपुरे यांनी या अभियानाला शुभेच्छा दिल्या. गणकशास्त्र विभागप्रमुख प्रा. अमोल सहस्रबुद्धे आणि या अभियानाचे शिक्षक प्रतिनिधी प्रा. केतन जोगळेकर यांनी हे अभियान व्यवस्थितरित्या होण्याची ग्वाही दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : IIT मुंबईच्या गेटबाहेर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; साहिल वाकोडे आत्महत्याप्रकरणी कार्यकर्ते आक्रमक, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

Maharashtra Rain Alert : बंगालच्या उपसागरातील 'डीप डिप्रेशन'ची तीव्रता वाढली; महाराष्ट्रात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, ओडिशा-आंध्र प्रदेश किनारपट्टीवर काय स्थिती?

IND vs AUS, U19 ODI: कर्णधाराचं शतक, सेहवागची फटकेबाजी; द्रविडला विश्रांती अन् युवा भारताचा ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश

Akola Crime : हिवताप अधिकाऱ्यासह लिपिक एसीबीच्या ताब्यात; आरोग्य उपसंचालक कार्यालय परिसरात लाचप्रकरणी कारवाई

Phulambri News : मराठा क्रांती मोर्चाचा तहसीलवर मोर्चा..! अमोल खुणे व अजय बारस्कर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT