कोकण

विद्युत दाब वाढल्याने उपकरणे जळून खाक

CD

विद्युत दाब वाढल्याने उपकरणे खाक

खेरवते येथील प्रकार ; महावितरणकडे भरपाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ५ ः अचानक वाढलेल्या विद्युत दाबामुळे खेरवसे जाधववाडी येथील अनेक ग्रामस्थांच्या घरातील पंखे, टीव्ही, फ्रिज यासारखी विद्युत उपकरणे जळून खाक झाली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना गुरूवारी मध्यरात्री २ च्या सुमारास घडली. महावितरण कंपनीने याचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. काही ठिकाणी सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरूच आहेत. लांजा शहरातदेखील हा प्रकार सुरू आहे. यातच खेरवसे जाधववाडी येथे काल रात्री दोनच्या सुमारास अचानकपणे विद्युत दाब वाढला. यामुळे दाबामुळे येथील अनेक ग्रामस्थांच्या घरातील टीव्ही, फ्रिज, पंखे, ट्यूबलाइट आदी विद्युत उपकरणे जळाली. तर काही घरातील वीज उपकरणे नादुरुस्त झाली आहेत. त्यामुळे या ग्रामस्थांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
विद्युत उपकरणे जळून नुकसान झालेल्यांमध्ये प्रवीण जाधव, विजय जाधव, सदानंद जाधव, मनोहर सावंत, राजू सावंत, रामचंद्र मेस्त्री, मंगला लोटणकर, राजेंद्र मेस्त्री, सुरेंद्र ब्रीद ,रामदास सावंत, परशुराम जाधव ,संतोष लोटणकर, रवींद्र केशव लोटणकर यांसह अशा अनेक ग्रामस्थांचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन नुकसान झालेल्या ग्रामस्थांच्या उपकरणाबाबत पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी खेरवसे जाधववाडी येथील ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diesel Rate: मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा! आता डिझेल प्रति लिटर ५ रुपयांनी स्वस्त मिळणार; पण कुणाला? जाणून घ्या...

Numerology : 'या' 5 मूलांकाचे लोक असतात सगळ्यांत जास्त निगरगट्ट; त्यांच्यासाठी कितीही चांगलं करा शेवटी तुम्हाला देतात धोका

Helmet Expiry Check: तुमचं हेल्मेट एक्सपायर झालंय? घरबसल्या ‘या’ ट्रिक्सने लगेच करा चेक

IPL 2026 Marathi News: श्रीलंकेच्या ३ खेळाडूंना मिळाली NOC! पथिरानासह ४ खेळाडू लटकले; RCB, KKR सह इतरांचे टेंशन वाढले

महाराष्ट्राचे पोलिस आरोपीला पकडायला यूपीमध्ये पोहोचले, लोकांनी त्यांनाच चोर समजून चोपले; एका गोष्टीमुळे झाली गडबड

SCROLL FOR NEXT