कोकण

आज रत्नागिरीत कार्यक्रम

CD

rat५p१६.jpg-
२४M९४९३४
न्यायमूर्ती रेवती डेरे मोहिते, मृदुला भाटकर, माधव जामदार

महिला वकीलीच्या प्रारंभाची शताब्दी


आज रत्नागिरीत कार्यक्रम ; न्यायमूर्तींची उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : भारताने १९२४ मध्ये महिलांसाठी न्यायालयाचे दरवाजे उघडले. तेव्हा कार्नेलिया सोराबजी कोलकात्यात परतल्या आणि बॅरिस्टर म्हणून त्यांनी नोंदणी केली. या ऐतिहासिक घटनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. देशातील व इंग्लंडमधील पहिल्या महिला वकील सोराबजी यांच्या सनद शताब्दी सोहळा उद्या (ता. ६) सायंकाळी ५.३० वाजता गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात आयोजित केला आहे.
या सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून न्यायमूर्ती रेवती डेरे मोहिते, न्यायमूर्ती माधव जामदार (मुंबई उच्च न्यायालय) तसेच न्यायमूर्ती मृदुला भाटकर उपस्थित राहणार आहेत. प्रधान जिल्हा न्यायाधिश सुनील गोसावी यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे, अशी माहिती रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी दिली.
अत्यंत कठीण परिस्थितीत तोंड देत कार्नेलिया सोराबजी यांनी पुरुषांच्या वर्चस्वाखाली असलेल्या वकिली व्यवसायात समर्थपणे पाय रोवून आपली वाट शोधून एक इतिहास घडवला. कार्नेलिया यांनी देशभर प्रवास करून अडचणीत असलेल्या महिलांना न्याय मिळवून दिला. २०१२ मध्ये इंग्लंडमधील प्रख्यात वकिलांनी देशातील वकिलीचा गाऊन परिधान करणारी पहिली महिला म्हणून सोराबजींच्या कांस्यप्रतिमेचे अनावरण केले. आज, लंडनमधील प्रतिष्ठित नॅशनल पोर्ट्रेट गॅलरीत कॉर्नेलिया सोराबजींचे पोर्ट्रेट भिंतीवर टांगले आहे, याचा साऱ्या भारतीयांना सार्थ अभिमान आहे.
कार्यक्रमात बार असोसिएशनमधील काही महिला सदस्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष ॲड. निनाद शिंदे, सचिव ॲड. रत्नदीप चाचले, ॲड. अवधूत कळंबटे, महिला उपाध्यक्ष ॲड. शाल्मली आंबुलकर, ॲड. राहुल चाचे आदी मेहनत घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune District News: वसतिगृहातून तीन अल्पवयीन विद्यार्थी गायब; १८ दिवस उलटूनही ठावठिकाणा नाही, जुन्नर पोलिसांकडून शोध सुरू

Pune FDA Action: पुण्यात FDAची कारवाई, भूम-वाशीतील खवा-पेढा विक्रेते रस्त्यावर; आमदार तानाजी सावंतांकडून प्रश्नाची दखल

रविवारी गुरुचा अश्लेषा नक्षत्रात प्रवेश; 'या' ७ राशींच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी

Nilanga Drought: निसर्गाची अवकृपा अन् कृषी विभागाची आकडेवारी; निलंग्यात खरीप पिकांचे १०० टक्के नुकसान, अहवालात ७० टक्केच नोंद

Latest Marathi News Update : शिरपूर तालुक्यात बिबट्याची दहशत; झोपडीत झोपलेल्या महिलेवर हल्ला

SCROLL FOR NEXT