कोकण

लांजा- दाभोळे मार्गावरील चिरे वाहतूक बंद

CD

‘लांजा-दाभोळे’वरील चिरे वाहतूक बंद

राष्ट्रवादीच्या आंदोलनाला यश ; अवजड वाहनांमुळे रस्त्याची दुरवस्था

सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ५ ः प्रशासनाकडून लांजा- दाभोळे मार्गावर अवजड वाहनांद्वारे केली जाणारी चिरे वाहतूक ही काल मध्यरात्रीपासून बंद करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बाबा धावणे यांच्या आंदोलनाला यश आले आहे.
लांजा तालुक्यात सापुचेतळे परिसरात भरपावसाळ्यात चिरेखाणी सुरू आहेत. याच चिरेखाणींतून मोठ्या प्रमाणात १६ टायर ट्रक या अवजड वाहनांद्वारे चिरे वाहतूक केली जात होती. या वाहतुकीमुळे लांजा-दाभोळे मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाणदेखील वाढीस लागले होते तसेच लांजा-दाभोळे रस्त्याचा विचार करता एवढी अवजड वाहतूक या रस्त्यावरून केली जाणे शक्य नसताना देखील ही वाहतूक सुरू असल्याने या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे वाहनचालक आणि पादचारी यांची गैरसोय होत होती. हा प्रकार बिनबोभाटपणे सुरू होता; मात्र तरीही आरटीओकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
या पार्श्वभूमीवर लांजा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) युवक तालुकाध्यक्ष चंद्रशेखर उर्फ बाबा धावणे आणि सोशल मीडिया फ्रंटचे जिल्हाध्यक्ष दाजी गडहिरे यांनी याबाबतचे निवेदन निवासी नायब तहसीलदार यांना सादर केले होते. लांजा-दाभोळे मार्गावरून अवजड वाहनातून सुरू असलेली चिरा वाहतूक ही तत्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी केली होती. काल ४ जुलैला मध्यरात्रीपासून ही वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाकडून गुरूवारी ४ जुलैला मध्यरात्रीपासून या लांजा-दाभोळे मार्गावरील अवजड वाहनातून केली जाणारी चिरा वाहतूक ही पूर्णपणे बंद करण्यात आल्याचे बाबा धावणे यांनी सांगितले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या आंदोलनाला यश आले असल्याचे यावरून स्पष्ट झाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divorce Petition :‘काळा रंग, जाडजूड शरीरयष्टी’वरून पत्नी टोमणे मारते; पतीने मागितला घटस्फोट, हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

लग्नाला १२ वर्ष होतील तरीही मला कळलेलं नाही की... श्रेया बुगडेने सांगितलं नवरा निखिल सेठसोबत कसं आहे नातं

Petrol-Diesel Price: कच्चे तेल महाग होत असताना आता भारतात पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार का? सरकारकडून स्पष्टीकरण

Maharashtra Ganesh Visarjan Live: लालबागच्या राजाची आरती सुरू

IND vs WI 1st ODI: ऋतुराज गायकवाड IN, यशस्वी जैस्वाल बाकावरच! नबीचे पदार्पण; पहिल्या वन डेसाठी तगडी Playing XI

SCROLL FOR NEXT