कोकण

जिल्ह्यात १० हजार मेट्रिक टन खत उपलब्ध

CD

जिल्ह्यात १० हजार मेट्रिक टन खत

शेतकऱ्यांना अंगठा रजिस्टर ; भरारी पथकांचीही नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : जिल्ह्यात भातशेती लावण्याची जोरदार लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात खत पुरवठा करण्यासाठी व निर्माण झालेल्या अपुऱ्या खत पुरवठ्याची दखल जिल्हा कृषी विभागाने घेतली आहे. जिल्ह्यासाठी आतापर्यंत १० हजार मेट्रिक टन खत उपलब्ध झालेले आहे. खत पुरवठ्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी विक्री केंद्राच्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अंगठा रजिस्टर ठेवण्यात आले आहे. गैरव्यवहार टाळण्यासाठी भरारी पथके नेमली आहेत.
मान्सूनने सर्वत्र चांगलाच जोर धरलेला असल्याने खरिपासाठी लगबग जिल्हाभरात सुरू आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेत खत पुरवठा होण्यासाठी जिल्हा कृषी विभागाने नियोजन केलेले आहे. जिल्ह्यासाठी सुमारे २० हजार मे. टन खताची आवशकता असते. केलेल्या मागणीनुसार १४ हजार ६४१ टन खताची मागणी मंजूर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने खताचा पुरवठा सुरू झालेला आहे. कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. त्यासाठी युरिया, संयुक्त, एसएसपी, एमओपी, डीएपी या खतांची मागणी करण्यात आली. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यांसाठी १० हजार मे. टन खत पुरवठा शासनाकडून झाला आहे.
प्रत्येक वर्षी खरीप हंगामाच्या तोंडावर खतांच्या तसे टंचाईला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे खरिपात निर्माण होणारी खतांची समस्या रोखण्यासाठी कृषी विभागाने लक्ष वेधले आहे. युरिया व डीएपीचा बफर स्टॉक करण्यावर भर दिला आहे. जिल्ह्यात खरीपाच्या कामांनी गती घेतलेली आहे. दरम्यान, देवरूख येथे शेतकऱ्यांना खत टंचाई निर्माण झालेली होती.
शेतकऱ्यांकडून युरिया खताची जास्त मागणी होऊ लागल्याने हा प्रश्न उभा ठाकलेला आहे; मात्र कृषी विभागाने केलेल्या मागणीनुसार जिल्ह्यासाठी पुन्हा खत पुरवठा उपलब्ध झाला आहे. शेतकऱ्यांना खतांचा वेळेवर पुरवठा व्हावा, वितरणात कोणताही गैरव्यवहार होऊ नये, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जि. प. कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माजी रेल्वे मंंत्री मुकूल रॉय यांचं निधन, वयाच्या ७१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ड्रग लॉर्ड एल मँचोचा एन्काउंटर! सर्वात मोठं कार्टेल लष्करी कारवाईत उद्ध्वस्त; मेक्सिकोत उसळला हिंसाचार

Maharashtra Weather Update : राज्यावर अवकाळीचे संकट ! 'या' जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरू, तुमच्या भागात कसे असेल हवामान? जाणून घ्या

IND vs SA: भारतीय संघाचा पराभव, पण बुमराह-अर्शदीपचे मोठे विक्रम; T20 World Cup इतिहासात ठरले सरस भारतीय गोलंदाज

Latest Marathi News Live Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT