कोकण

''संच मान्यता'' निर्णय रद्द करा

CD

M95051

‘संच मान्यता’ निर्णय रद्द करा
राजन तेलीः मुख्यमंत्री शिंदेंना निवेदन सादर
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ः शाळा संच मान्यता निकष १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी माजी आमदार राजन तेली यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन त्यांनी ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी त्यांना सादर केले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत हे उपस्थित होते.
श्री. तेली यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे की, ‘२८ ऑगस्ट २०१५ च्या शासन निर्णयाने शाळांच्या संच मान्यतेचे निकष निश्चित केलेले आहेत. यानुसार संच मान्यता चालू आहे. आता १५ मार्च २०२४ ला शासनाने संच मान्यतेसाठी नवीन शासन आदेश काढलेला आहे. या शासन निर्णयानुसार संच मान्यता आल्यास ग्रामीण भागातील विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापुर, ठाणे, पालघर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील शाळांना शिक्षक मान्य होणार नाहीत. त्यामुळे शाळा बंद होतील आणि ग्रामीण मुले शिक्षणापासून वंचित राहतील. प्रत्येक वर्गात २० पटसंख्या ही अट या शासन निर्णयात आहे. त्यामुळे या निकषामुळे ग्रामीण शाळा बंद होतील. १५० मुलांसाठी मुख्याध्यापक ही अट ठेवल्याने अनेक शाळांना मुख्याध्यापक मिळणार नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे १२५ शाळा मुख्याध्यापकांशिवाय राहतील. खरे तर शाळा तिथे मुख्याध्यापक आवश्यक आहे. २८ ऑगस्ट २०१५ च्या शासन निर्णय (जीआर) मध्ये १०० पटसंख्येला मुख्याध्यापक पद होते व पटसंख्या कमी झाल्यास मुख्याध्यापक सेवानिवृत्त होईपर्यंत संरक्षण होते. परंतु, नवीन जीआरमध्ये १५० पेक्षा कमी पटसंख्या झाल्यास मुख्याध्यापक पद जाईल व मुख्याध्यापकास वेतन श्रेणी दिली तरी शिक्षक पदावर समायोजित केले जाणार आहे. २५-३० वर्षे काम केलेल्या मुख्याध्यापकास शिक्षक म्हणून काम करणे म्हणजे चुकीचे होईल. तरी संच मान्यता निकष १५ मार्च २०२४ चा शासननिर्णय (जीआर) रद्द करण्यात यावा.''अशी विनंती श्री. तेली यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Dhangar Shetkari News: पोटाची खळगी भरण्यासाठी मेंढपाळांची शेकडो किमीची पायपीट; वाढता उष्मा चारा पाण्याचं संकट, शिक्षणापासून वंचित पिढी..

Everest Base Camp: तन्मय नाईकने १७,४०० फूटांवर गाठले ध्येय, विरारचा ट्रेकर हिमालयात चमकला, ९ जणांतून एकटाच यशस्वी!

"म्हणून आम्ही मुलाचा विचार केला नाही" राकेशने केला मूल होऊ न देण्याच्या निर्णयाबाबतचा खुलासा

CIBIL स्कोर चेक करायला एक रुपयाही होणार नाही खर्च; काही सेकंदात मिळेल संपूर्ण रिपोर्ट, 'इथे' पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : शिरोलीत पक्ष्यांसाठी पाणवठे ठरले जीवनदायी; उन्हाळ्यात दिलासा

SCROLL FOR NEXT