कोकण

बापूसाहेब महाराजांच्या विचारांचा वारसा जपा

CD

बापूसाहेब महाराजांच्या
विचारांचा वारसा जपा

आर. ए. सावंत ः बांद्यात अभिवादन

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ६ ः विविध जनकल्याण योजना राबविणारे व गोरगरिबांच्या कल्याणासाठी नेहमीच झटणारे रामराजे पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज हे होते. म्हणूनच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी त्यांचा उल्लेख ‘रामराजे’ असा केला होता. त्यांच्या विचारांचा आदर्श आताच्या पिढीने घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नट वाचनालयचे अध्यक्ष एस. आर. सावंत यांनी येथे केले.
येथील नट वाचनालयात पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. वाचनालयाचे उपाध्यक्ष नीलेश मोरजकर, कार्यवाह राकेश केसरकर, सहकार्यवाह हेमंत मोर्ये, संचालक जगन्नाथ सातोसकर, प्रकाश पाणदरे, शंकर नार्वेकर, स्वप्नीता सावंत, अंकुश माजगावकर, ग्रंथपाल सुस्मिता नाईक, सहाय्यक ग्रंथपाल सुनील नातू, ओंकार राऊळ आदी उपस्थित होते. यावेळी सावंत यांनी बापूसाहेब महाराजांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. बापूसाहेब हे आपल्या कार्यकाळात येथील नट वाचनालयच्या इमारतीत बसून वाचन करत असत. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून ते त्यांच्या व्यथा जाणून घेत, असे ते म्हणाले. राकेश केसरकर यांनी आभार मानले.
95119

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandigram Bypoll : पश्चिम बंगालमधील नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठा ट्विस्ट; ममता बॅनर्जींच्या उमेदवाराची अचानक माघार, नेमकं काय घडलं?

LP Gas Tanker Accident: वाडाखडकोना येथे एलपी गॅस टँकर कलंडला; गळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला

Festival Makeup Skin Care: सणासुदीला मेकअपमुळे त्वचा बिघडतेय? १० मिनिटांत करा ‘हा’ घरगुती राइस जेल; चेहरा दिसेल फ्रेश

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Pali Stray Dogs: पालीत भटक्या कुत्र्यांचा कहर; १० वर्षांच्या चिमुरडीसह भाविक महिलेला चावा

SCROLL FOR NEXT