कोकण

पान एक-जिल्ह्यात पुन्हा दमदार सरी

CD

जिल्ह्यात पुन्हा दमदार सरी
ऑरेंज अलर्ट ः जोर आणखी वाढणार

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ६ ः जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत. हवामान विभागाने पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज दिला असून, पुढील चार दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर केला आहे. दोडामार्ग तालुक्यात आज सर्वाधिक ७८.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढला आहे; मात्र पाऊस काही भागात जोरदार, तर काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पडत होता. दोडामार्ग तालुक्यात शुक्रवारी (ता. ५) दिवसभर मुसळधार पाऊस झाला; मात्र उर्वरित जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी होते. आज सकाळपासून जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या दमदार सरी पडल्या. सायंकाळी पावसाचा जोर वाढला. सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ, कणकवली आणि वैभववाडी तालुक्यांत पावसाचा जोर अधिक आहे. या तालुक्यांमध्ये दुपारनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत देखील वाढ झाली आहे. जिल्ह्यात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. भातरोप पुनर्लागवड युध्दपातळीवर सुरू झाली आहे.

पुढील चार दिवस ‘ऑरेंज अर्लट’
दरम्यान, हवामान विभागाने पुढील चार दिवस जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर केला आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. नियमित चार-पाच दिवस पाऊस झाल्यास भातरोप पुनर्लागवडीला तो पोषक ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: ''रुपाली चाकणकरच पीडितांना खरातकडे पाठवायच्या'', महिला नेत्याचे गंभीर आरोप, केली अटकेची मागणी

Mumbai Crime: प्रेयसीने ब्रेकअप केलं, तरुणाचा संताप अनावर, भररस्त्यात तरुणीला गाठलं अन्...; मुंबईत काय घडलं?

Dabhol beach dolphin rescue : डोल्फिन मासा दिशा भटकला अन् आला किनाऱ्यावर, नंतर तरूणांनी जे केलं आश्चर्यकारक, ग्रामस्थही म्हणाले...

Property Card Scheme: राज्यातील मालमत्ताधारकांसाठी खुशखबर! नागरिकांना मिळणार मिळकतपत्रिका; काेणत्या दहा जिल्ह्यात राबतेय याेजना..

Chandrapur Crime : 5 हजार रुपयांचं विष अन् खाकी वर्दीला काळिमा! प्रेमसंबंधाला विरोध केला म्हणून मिल्कशेक पाजून लेकीनंच पोलिस बापाला संपवलं

SCROLL FOR NEXT