कोकण

राणेंकडून रस्ता पाहणीची स्टंटबाजी

CD

राणेंकडून रस्ता पाहणीची स्टंटबाजी

अतुल रावराणे ः ‘करूळ’ची प्रथम पाहणी का नाही केली?

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता.६ ः करूळ घाटरस्त्याचे काम निकृष्ट झाल्याची कबुली देणाऱ्या आमदार नीतेश राणे यांनी सहा महिन्यांत रस्त्याची पाहणी का केली नाही? असा सवाल ठाकरे शिवसेनेचे नेते अतुल रावराणे यांनी केला आहे. रस्त्याची पाहणी ही केवळ स्टंटबाजी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
आमदार राणे यांनी शुक्रवारी (ता. ५) करूळ घाटरस्त्याची पाहणी केली. त्या पाहणी दौऱ्यावर आज रावराणे यांनी प्रसिद्धी पत्रकातून जोरदार टीका केली. करूळ घाट हा व्यापार उद्योगात वृद्धी करणारा आणि मोठ्या प्रमाणात दळणवळण असलेला घाट मार्ग आहे; मात्र या घाटमार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. येथील स्थानिक आमदार राणे यांनी शुक्रवारी कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांना झापल्याची स्टंटबाजी केली; मात्र काम निकृष्ट होत असताना सहा महिन्यांत त्यांनी का पाहणी केली नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ठाकरे शिवसेनेने आवाज उठविल्यानंतर त्यांना जाग आली. आमदार राणेंनी पाहणी दौऱ्यात ‘मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर’ असा स्टंट करण्याचा प्रकार केला.
घाटमार्गाचे काम दर्जेदार होणे अपेक्षित होते; मात्र ४० टक्के ‘बिलो’ने टेंडर भरलेल्या ठेकेदाराला हे टेंडर देण्यात आले. या कामाच्या टेंडरची चौकशी व्हावी व ‘रिटेंडर’ व्हावे, यासाठी शिवसेना पक्षाने आवाज उठविला; परंतु त्यावेळी आमदारांनी काहीही केले नाही. या ठेकेदाराला आणि अधिकाऱ्यांना कोणाचे अभय आहे, हे लोकांना माहीत आहे. त्यामुळे संपूर्ण देशात रस्ते विकासमध्ये नंबर एकचे काम करणारे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यात लक्ष घालून कारवाई करतील का? घाटमार्गाच्या निकृष्ट कामाबाबत दोषींवर कारवाई करण्याची हिंमत पालकमंत्री रवींद्र चव्हाण दाखवतील का? असा सवाल देखील रावराणे यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT