कोकण

मणेरीत घरावर माड पडून नुकसान

CD

मणेरीत घरावर माड पडून नुकसान
दोडामार्ग, ता. ६ : तालुक्याला आज मुसळधार पावसाने झोडपले. वाऱ्यासह पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झली. मणेरी-कुबलवाडी येथील ऋतिक राजन सुतार यांच्या घरावर वादळी पावसामुळे माड कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही; मात्र घराचे पत्रे, कौले, वासे यांचे नुकसान झाले. पावसाचे पाणी घरात शिरल्याने जीवनावश्यक साहित्याचेही नुकसान झाले.
दोडामार्ग तालुक्यात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज सकाळपासूनच सोसाट्याचा वारा सुरू झाला. या वाऱ्यासहित झालेल्या पावसात मणेरी-कुबलवाडी येथे ऋतिक सुतार यांच्या घरावर मोठा माड कोसळला. यावेळी मोठा आवाज झाला. त्यामुळे घरातील मंडळींची भीतीने गाळण उडाली. माड घरावर पडल्याने पत्रे, कौले, वासे यांचे मोठे नुकसान झाले. पावसाचे पाणी फुटलेल्या छप्परातून घरात पडू लागले. त्यामुळे घरातील जीवनावश्यक सामानही भिजले.
या घटनेची माहिती उपसरपंच विशाल मोहन परब व सदस्य विजया महेश शिरंगेकर यांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. पाऊस ओसरल्यानंतर माड तोडून बाजूला करण्यात आला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
95250

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT