कोकण

ऑनलाईन फसवणूकप्रकरणी चौघांना न्यायालयीन कोठडी

CD

ऑनलाईन फसवणूकप्रकरणी
चौघांना न्यायालयीन कोठडी

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ६ ः शेअर मार्केटच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या चौघा संशयितांना अटक करून सीबीआयने आज येथील न्यायालयात हजर केले. या चौघाही संशयितांना येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पी. आर. ढोरे यांनी न्यायालयीन कोठडी ठोठावली.
अधिक माहिती अशी, संशयित गिरीश पहवानी (रा. भिवंडी), लक्ष्मीकांत शर्मा (रा. मध्य प्रदेश), हेमंत अग्रवाल आणि स्वप्नील प्रजापती (रा. इंदोर) या चौघांविरोधात माणगाव येथील फिर्यादी अजय नारायण चव्हाण यांनी शेअर मार्केटमध्ये ऑनलाईन पैसे गुंतवून दाम दुप्पट रक्कम करण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याची फिर्याद दिली होती. त्यानुसार या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. ही घटना २०१८ मध्ये घडली. त्यानंतर फिर्यादीने वारंवार विचारणा केली; मात्र संशयितांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे २०२० मध्ये दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून पोलिस संशयितांच्या शोधात होते. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आली. सीबीआयने विविध ठिकाणी तपास करून संशयितांच्या मुसक्या आवळल्या. प्रकरण कुडाळमधील असल्याने आज सायंकाळी चारही संशयितांना येथील न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीअंती चौघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. संशयितांनी बारा ठिकाणी फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Drought Tweet : यंदा पावसाने दगा दिला; एकनाथ शिंदे यांचे ट्वीट चर्चेत, नेमकं काय म्हणाले शिंदे

रस्त्याने चालताना अघटित घडलं! बंद गोदामाच्या बाल्कनीचा भाग थेट पादचाऱ्यावर कोसळला, साकीनाक्यातील थरारक घटना CCTVत कैद

Ratnagiri Water Shortage: रत्नागिरी शहरात पाणी कपातीच्या हालचाली; नगरपालिका सभेत दुष्काळसदृश स्थितीमुळे टंचाईवर चर्चा

Latest Marathi News Live Update : कन्नड तालुक्यावर भीषण दुष्काळाचे सावट; हातातोंडाशी आलेली खरीपाची पिके डोळ्यांसमोर जळून खाक

Sunil Tatkare: खासदार सुनील तटकरेंच्या आक्रमक भूमिकेचा दणका; काही तासांत सूत्रे फिरली; खेडमधील २.५ कोटींच्या कामांना वर्कऑर्डर

SCROLL FOR NEXT