कोकण

पाट महाविद्यालयात देसाई यांना अभिवादन

CD

पाट महाविद्यालयात
देसाई यांना अभिवादन
म्हापण, ता. ७ : पाट येथील डॉ .विलासराव देसाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात (कै.) डॉ. विलासराव देसाई द्वितीय स्मृतीदिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, पाट पंचक्रोशीचे उपाध्यक्ष डी. ए. सामंत, संस्था सचिव अवधूत रेगे, संस्था पदाधिकारी सुधीर ठाकूर, राजेश सामंत, नारायण तळवडेकर हे उपस्थित होते. एस. एल. देसाई विद्यालय आणि (कै.) सौ. एस. आर. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक बोंदर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या सौ. ए. ए. शेटकर यांनी केले. महाविद्यालयातील विद्यार्थी वैभव केरकर याने आपले मनोगत व्यक्त केले. प्राध्यापक जी. एन. परब यांनी आपल्या मनोगतातून डॉ. विलासराव देसाई यांच्या स्मृतींना उजाळा दिला. आजच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बदलता अभ्यासक्रम आत्मसात करण्यासाठी पदवी शिक्षण कसे गरजेचे आहे, याबद्दल संस्था सदस्य सुधीर ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ध्येयनिश्चिती करून त्या ध्येयाचा पाठलाग करत विद्यार्थ्यांनी यश संपादन करावे, असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष सामंत यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन प्राध्यापिका सौ. एस. एस. गोसावी यांनी, तर प्रा डी. एन. परब यांनी आभार मानले.


९५३४१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy: तिलक वर्मा ९९ धावांवर आऊट अन् मग वैभव सूर्यवंशी, ईशान किशनसह पूर्व विभागानं जे केलं, त्यानं जिंकली कोट्यवधींची मनं!; Video

CSMT Redevelopment : सीएसएमटीचा ‘वर्ल्ड हेरिटेज’ दर्जा; पुनर्विकासाने मात्र रेल्वेचीच कोंडी! प्लॅटफॉर्म १६-१७ सात महिन्यांपासून बंद, आता १४-१५ ताब्यात देण्याची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय यांचा पहिलाच परदेश दौरा

MLA Manoj Kayande : सिंदखेड राजा मतदारसंघांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Pune News : विद्यानंद बापट हल्ला प्रकरणातील संतोष चव्हाणचा जामीन न्यायालयाने फेटाळला

SCROLL FOR NEXT