कोकण

कोकणातील मंदिरांच्या माहितीसाठी वेबसाईट

CD

कोकणातील मंदिरांच्या माहितीसाठी वेबसाईट
पर्यटन महासंघाचा पुढाकारः मंदिर ट्रस्टींसह भाविकांना आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ९ः कोकणातील धार्मिक पर्यटन वाढीसाठी जगभरातील दहा लाखाहून जास्त इ-व्हिजिटरने भेट दिलेल्या सिंधुदुर्ग पर्यटन डॉट कॉम या वेबसाईटवरून आता कोकणातील सर्व मंदिरांची माहिती छायाचित्रासह उपलब्ध करण्याचे काम पर्यटन व्यावसायिक महासंघाने सुरु केल्याची माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी दिली आहे.
राज्य व केंद्राच्या माध्यमातून क वर्ग, ब वर्ग तसेच धार्मिक पर्यटन वाढीसाठी करोडो रुपये खर्च होत आहेत. परंतु, कोकणातील काही प्रमुख मंदिरे सोडून शासनाने करोडो रुपये धार्मिक पर्यटन वाढीसाठी खर्च केलेले आहेत. पण, एकाही मंदिराची त्या देवस्थानाची परिपूर्ण माहिती ऑनलाईन उपलब्ध केली नसल्यामुळे कोकणातील धार्मिक इतिहास हा जगासाठी अपरिचित राहिला आहे.
कोकणातील मंदिरांची माहिती संकलनाचे काम सुरू झाले आहे. यासाठी जिल्ह्यातील मंदिर ट्रस्टी तसेच भाविकांनी आपापल्या गावातील मंदिरांची फोटो, मंदिराची ऐतिहासिक माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघापर्यंत पोहोचवावी जेणेकरून पर्यटन व्यावसायिक महासंघास काम करणे सोपे जाईल. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून सर्व मंदिरांची माहिती जगभरात प्रसारण करता येईल. ही माहिती देताना त्या त्या गावातील ट्रस्टींनी विशेष लक्ष द्यावे तसेच मंदिराच्या कार्यकारणीची फोटोसहित माहिती दिल्यास तशीच माहिती प्रसिद्ध केली जाईल.
सोबत ट्रस्टचे फोटो असावेत. काही गावात जर ऑनलाइन पुजा अभिषेक सारखे कार्यक्रम तसेच अनेक प्रकारच्या धार्मिक विधी होत असतात त्यांनीही अशी माहिती द्यावी. जेणेकरून भक्तगणांना आपल्या राहत्या जागेवरून मंदिराचे दर्शन घेता येईल तसेच कोकणातील धार्मिक संस्कृती प्रत्यक्ष पाहण्यासाठी धार्मिक विधीसाठी त्या त्या भागातील मंदिरांना भेट देता येईल तसेच ज्या भक्तांना काही देणगी द्यायची असेल तर ते मंदिराच्या व्यवस्थापन कमिटीकडे देणगी सुपूर्द करू शकतील तसेच माहिती देताना त्या गावातील मंदिरातील पुजारी, व्यवस्थापन कमिटी यांचे संपर्क क्रमांक असावेत. गुगल लोकेशन असावे. आपल्या भागातील मंदिराची अद्ययावत माहिती एम डी. कन्सल्टन्सी यांच्याकडे द्यावी, असे आवाहन श्री. मोंडकर यांनी केले आहे.

कोट
कोकणातील अनेक मंदिरे पांडवकाळीन आहेत. अनेक हिंदू संस्कृती जतन करून आहेत. आजही अनेक मंदिर कोकणातील बांधकाम शैली जपून आहेत. ही हिंदू संस्कृती जगासमोर आणण्यासाठी कोकणातील धार्मिक उपासना पद्धती देश विदेशात पोचवून देण्याच्या प्रमुख उद्देशाने पर्यटन व्यावसायिक महासंघ प्रयत्नशील आहे.
- विष्णू मोंडकर, अध्यक्ष, पर्यटन व्यावसायिक महासंघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Shinde vs Thackeray Group : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी ‘युद्ध’; दिशा सालियन प्रकरणाला ‘गद्दारी’वरुन प्रत्‍युत्तर, पोलिस परवानगीने आश्चर्य

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bomb Detection Squad Miraj : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी; शहरातील प्रमुख मार्ग बंद

Maharashtra Ganesh Visarjan Live: जवखेडा ठोंबरे येथे शेतकरी संवाद सभा

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

SCROLL FOR NEXT