कोकण

मुसळधार पावसाने कणकवलीला झोडपले

CD

मुसळधार पावसाने
कणकवलीला झोडपले
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ७ : मृग नक्षत्रानंतर भातशेतीचा हंगाम सुरू झाला असून, आता शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे अडचण निर्माण केली आहे. तालुक्यासह शहराला आज मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे बहुतांश भागातील भात शेती पाण्याखाली गेली होती. गेल्या महिन्याभरापासून दमदार पावसाला सुरुवात झाली आहे; परंतु मुसळधार पाऊस फारसा झाला नव्हता. आज सकाळपासून तालुक्यातील विविध भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळच्या सत्रात मंद गतीने पाऊस होता; मात्र दुपारनंतर मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश रस्ते पाण्याखाली गेले होते. पावसाचा जोर असल्याने शेतशिवारांतही पाणी घुसले. त्यामुळे शेतकऱ्यांना कामे अर्धवट ठेवून घरी परतावे लागले. सह्याद्री पट्ट्यात आज सकाळपासून पावसाचा जोर होता. दुपारनंतर ठिकठिकाणी मुसळधार वृष्टी झाली. नदीनाल्यांना पूरसदृश पाणी आले होते. बहुतांशी नदी, नाले ओसंडून वाहू लागले होते. आज रविवार असल्याने बाजारपेठेत फारशी गर्दी नव्हती. वाहनांचीही रस्त्यावर वर्दळ नव्हती. पर्यटनासाठी फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे पर्यटनस्थळांवर शुकशुकाट होता. धबधबे ओसंडून वाहू लागल्याने पर्यटकांनी पावसाळी पर्यटनाचा बेत रद्द केल्याचे चित्र होते.

९५३८०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : ही शान कुणाची...! लालबागच्या राजाची पहिली झलक समोर; भव्य मंदिरसदृश प्रवेशद्वार अन् महाकाय त्रिशूळाची चर्चा, पाहा खास Photo

काय राव, सगळ्या DRSचं क्रेडिट तू घेतलंस! ईशान किशन किशनने वैभवला चिडवलं; १५ वर्षांच्या पठ्ठ्यानेही लगेच दिलं भन्नाट उत्तर, नेमकं काय घडलं?

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

Latest Marathi News Live Update : मविआचं सरकार पाडण्यासाठी ५ हजार कोटी खर्च, ठाकरेंच्या खासदाराचा गंभीर आरोप

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

SCROLL FOR NEXT