कोकण

खेड-जगबुडी नदी इशारा पातळीवर

CD

जगबुडी नदी इशारा पातळीवर
खेडमध्ये जनजीवन विस्कळित : शहराला पुराचा धोका
खेड, ता. ७ : खेड तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रविवारी दुपारनंतर कहर केला. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले. जगबुडी नदी ५.३० मीटर ही इशारा पातळीवरून वाहू लागली आहे. त्यामुळे शहरात पाणी घुसण्याची शक्यता आहे.
दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाचा जोर रविवारी सकाळपासून वाढला. शहरासह तालुक्याला पावसाने झोडपून काढले. नारिंगी, चोरद व जगबुडी नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढली आहे. जगबुडी नदीने सकाळीच १० वाजण्याच्या सुमारास इशारा पातळी ओलांडली. त्यामुळे पाणी वाढून शहरात शिरण्याचा धोका कायम आहे.
हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने येथील प्रशासन अलर्ट मोडवर असून नदीकाठच्या गावांना तसेच शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पावसामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. महामार्गावरील भरणे नाका येथील गटारांचे काम अर्धवट असल्याने आणि भरणे नाक्यावरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातून आणि पावसाच्या पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT