कोकण

आपटीत विद्यार्थ्यांनी घेतली सीईओ पुजार यांची मुलाखत

CD

95500

विद्यार्थ्यांनी घेतली ‘सीईओं’ची मुलाखत

आपटी शाळेचा उपक्रम; विविध प्रश्नांना दिली उत्तरे

सकाळ वृत्तसेवा

गावतळे, ता. ८ ः दापोली तालुक्यातील आपटी प्राथमिक शाळेला जिल्हा परिषदे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी भेट दिली. या भेटीवेळी लहान मुलांनी सीईओंची मुलाखत घेतली.
गटशिक्षणाधिकारी बळवंतराव यांनी दापोली तालुक्याच्या व्हिजन कार्यक्रमाविषयी व व्हिजन दापोली कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत होत असलेला सकारात्मक बदल याविषयी सीईओ पुजार यांना माहिती दिली होती. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे मुलाखत असून त्यासाठी वेळ द्यावा, अशी विनंती केली होती. त्यांच्या अनुमतीने आपटी शाळेच्या चिमुकल्यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांचे बालपण, शिक्षण, आवडते शिक्षक, छंद, खेळ याविषयी मुलांनी प्रश्न विचारले.
श्री. पुजार यांनीही अतिशय सुंदर प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. त्यानंतर श्री. पुजार यांनीही मुलांना प्रश्न विचारले. त्याची उत्तरे मुलांनी दिली. या वेळी गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील खरात, गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, कृषी अधिकारी श्रीमती रेवाळे, सरपंच संपदा आग्रे, टाळसुरे केंद्राचे केंद्रप्रमुख प्रवीण तांबे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT