कोकण

मोर्चा आणि ठिय्या

CD

९५३४६
पान १

वाढाव्यात
९५३५१

गोवंश हत्येविरोधात रास्ता रोको
सकल हिंदू समाज आक्रमक ः पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : एमआयडीसी परिसरात झालेल्या गोवंश हत्येविरोधात सकल हिंदू समाज आक्रमक झाला. येथे रविवारी सकाळी मारुती मंदिरपासून पोलिस अधीक्षक कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढून निषेध नोंदवला. या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीला हिंदू समाजाच्या मागणीनंतर तत्काळ न्यायालयात हजर केल्यानंतर दोन तासांनी मुख्य मार्गावरील रास्ता रोको मागे घेतला. आपल्या मागणीवर शेवटपर्यंत ठाम राहिल्याने व माजी खासदार नीलेश राणे यांच्या भक्कम पाठबळावर अखेर हिंदू समाजाच्या आंदोलनाला यश आले.
जाब विचारू मोर्चाला मारुती मंदिर येथून सुरुवात झाली. दीड हजारांहून अधिक हिंदू लोक सहभागी झाले. सकल हिंदू समाजाने आंदोलनाची हाक दिली असल्याने हिंदुंनी एकी दाखवत भर पावसात आंदोलन केले. आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. गो हत्या को बंद करेंगे, ये संकल्प हमारा है, गो सेवा ही गोपाळ सेवा, जय श्रीराम, जयजय श्रीराम, हर हर महादेव, जय शिवाजी, संभाजी महाराजांचा विजय असो अशा घोषणांनी आसमंत दुमदुमला. हा मोर्चा जेल रोडवरून पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे निघाला. बॅरिकेड्‌स‌ लावून मोर्चेकऱ्यांना येथे पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आधीच अडवले. माजी खासदार नीलेश राणे यांनी आम्ही चर्चा करायला जाणार नाही, चर्चा इथेच सर्वांसमोर होईल, असे सांगितले. त्यानंतर पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी कार्यालयाबाहेर येऊन थेट मोर्चेकऱ्यांशी संवाद साधला. आंदोलनात सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
नीलेश राणे म्हणाले, ‘‘ज्याने हे कृत्य केले आहे, त्याला मोका लावा. कोकणनगर येथील ती व्यक्ती आहे. त्याला तीन वेळा पकडले होते. त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. हे प्रकार चालतात ते ठिकाण उद्ध्वस्त करा. गो हत्या बंदी कायदा असतानाही रत्नागिरीत असे प्रकार घडणे दुर्दैवी आहे.’’
संशयित आरोपीला न्यायालयात नेऊन हजर करा या मागणीवर हिंदू कार्यकर्ते ठाम राहिले. चर्चा झाल्यानंतर जेल रोड नाक्यावर मुख्य मार्गावर रास्ता रोको केला. यामुळे वाहतूक कोंडी झाली. वाहतूक अन्य मार्गाने वळवली. भरपावसात आंदोलक भजने म्हणत होते, घोषणा देत होते. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि दीड तासाने हा मार्ग मोकळा झाला.

कोट
या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आठ पथकांद्वारे तपास सुरू आहे. सीसीटीव्हीद्वारे माहिती घेतली आहे. आपल्या मागणीनुसार सक्षम अधिकारी नेमून एसआयटीद्वारे चौकशी करण्यात येईल. आम्ही कोणालाही पाठीशी घातले नाही. काल एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात कठोरात कठोर कारवाई केली जाईल. तस्करी करणाऱ्यांची माहिती दिली तर तशी कारवाई केली जाईल. यात कोणी पोलिस सामील असल्यास त्याचे निलंबनच नव्हे बडतर्फ करू.
- धनंजय कुलकर्णी, पोलिस अधीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2027: गांगुलीने निवडली टीम इंडियाची Playing XI; रोहित-कोहलीसह ‘या’ खेळाडूंना संधी, पण एका स्टारला थेट केलं OUT

Latest Marathi News Live Update : धानावरील करपा, खोडकिडीच्या संकटावर आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

Kothrud Road,:कोथरूडमधील वृक्षतोडीला स्थगिती; पुनर्रोपणासाठी जागा उपलब्ध नाही

Manmad-Indore Railway;मनमाड-इंदूर रेल्वेसाठी ४,९३० कोटींची निविदा; महू-ग्यासपूरखेडी ७२.६६ किलोमीटर मार्ग; ४८ महिन्यांची कामासाठी मुदत

CJP Mumbai Protest: मुंबईत 'सीजेपी'चा एल्गार! मंत्रालयाबाहेर 'जेन नेक्स्ट' एकवटले; अभिजित दीपकेंचं मोठं विधान, म्हणाले...

SCROLL FOR NEXT