कोकण

खोपी गोरेवाडी येथे हातभट्टीवर छापा

CD

खोपी गोरेवाडी येथे
हातभट्टीवर छापा
खेडः खोपी गोरेवाडी येथील जंगलमय भागात विनापरवाना गावठी हातभट्टीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत १० हजाराचा १०० लिटर गुळ नवसागर मिश्रीत रसायन जप्त केले. खेड पोलिसात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बाबू बाळाजी गोरे (वय ३७, रा. खोपी गोरेवाडी, खेड) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ६) निदर्शनास आली. खोपी गोरेवाडी या परिसरात गावठी हातभट्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन रसायन जप्त केले.
-----
ऐनवलीत शेततळ्याचे
प्लॅस्टिक कागद चोरीस
खेड : ऐनवली येथील एका शेतकऱ्याच्या शेततळ्याचे सुमारे १० हजाराचा प्लॅस्टिक काळा कागद चोरट्याने चोरून नेला. अनोळखी व्यक्तीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. ६) उघडकीस आली. शेतकऱ्याच्या मालकीच्या जमीन जागेत असलेले शेततळ्याचा प्लॅस्टिक कागदाचा अर्धा भाग चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी फिर्यादी यांनी खेड पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.
------
कंटेनरच्या धडकेत
दुचाकीस्वार गंभीर
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटानजीक कंटेनरला दुचाकीची धडक झाली. या अपघातात स्वार गंभीर जखमी झाला आहे. राहुल राजेंद्र रेडीज असे गंभीर जखमी स्वाराचे नाव आहे. खोपीफाटा येथे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्या ठिकाणाहून दुचाकीस्वार चुकीच्या बाजूने चिपळूणच्या दिशेने जात असताना चिपळूणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला दुचाकीची धडक बसली. यात गंभीररित्या जखमी झालेल्या रेडीज यांच्या पायाला मोठी दुखापत झाली. अपघाताचे वृत्त कळताच मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी तातडीने घटनास्थळी पोहचून गंभीर जखमीस नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: अशोक खरातच्या मुलाने दिली धक्कादायक कबुली... आई कुणाकडे पैसे द्यायची? उत्तर ऐकून पोलिसही चक्रावले

Gold Rate Today: युद्धाचा परिणाम! सोन्याच्या भावात मोठी उलथापालथ; पाहा ताजे भाव

Solapur Car Accident : पहाटे भीषण अपघात ! कार कॅनॉलमध्ये कोसळली, जावई बचावला मात्र पत्नीसह सासू-सासऱ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

Latest Marathi News Live Update : साखरपा येथे खाजगी प्रवाशी ट्रॅव्हल्स जळून खाक, मोठा अनर्थ टळला

Good Friday 2026: आज 'हॅपी गुड फ्रायडे' का म्हणत नाहीत? जाणून घ्या यामागचं खरं कारण आणि इतिहास

SCROLL FOR NEXT