कोकण

पावसाने भिंत कोसळल्यामुळे सिंधुदुर्गनगरीत महिला जखमी

CD

पावसाने भिंत कोसळल्यामुळे
सिंधुदुर्गनगरीत महिला जखमी

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ७ ः जिल्ह्याची राजधानी असलेल्या सिंधुदुर्गनगरीमध्ये आज मुसळधार पावसाने हाहाकार उडविला. येथील ख्रिश्चनवाडी नजीक असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरून पुराचे पाणी नजीक असलेल्या वस्तीमध्ये पाणी शिरले. यामुळे येथील नागरिकांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. एका घराची भिंत कोसळून महिला जखमी झाली आहे. तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सिंधुदुर्गनगरीत आज दिवसभर धुवाँधार पाऊस कोसळला. यामुळे दुपारच्या सत्रात येथील ओहोळाला पूर आला. महामार्ग तयार झाल्यानंतर पाण्याच्या प्रवाहाचे मार्ग बदलले गेले. तसेच या बदललेल्या प्रवाहांना सक्षम पर्याय तयार केले गेले नाहीत. त्यामुळे पूर येताच हे पाणी महामार्गावरून वाहू लागले. महामार्गावर चढलेले पाणी थेट रस्त्यानजीक असलेल्या वस्तीत घुसले. यामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला होता. महामार्ग व लगतची घरे पाण्याखाली गेली होती. काही लोकांना तत्काळ सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. काही नागरिक बराच वेळ घरात अडकून पडले होते. याबाबत माहिती मिळताच पोलिस यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन व नागरिक मदतकार्यासाठी धावून आले. यावेळी महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महामार्ग व या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. ख्रिश्चनवाडी येथील चर्च व त्या परिसरातील घरे पाण्याखाली गेली. महामार्गावर पाणी आल्यामुळे पोलिसांनी महामार्ग बंद केला. ही वाहतूक जिजामाता चौक येथून सामाजिक न्याय भवनमार्गे मुख्यालयातून सुरू केली होती.
95505

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DK Shivakumar : कर्नाटकातील १२ आमदारांची दोन लग्ने; खुद्द मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे यादी, बंगळूरला स्थायिक झाल्याची माहीती

पत्नीच्या वाढदिवसानिमित्त स्वप्नील जोशीची खास पोस्ट; सुरू केलाय खास व्यवसाय; म्हणतो- जितकी मेहनत या ब्रॅण्डसाठी घेतेयस...

ना ढोल-ताशे, ना गर्दी... एकट्या भक्ताचा स्वतः घडवलेला बाप्पाला भावूक निरोप; डोळे पाणावणारा Video Viral

Madhya Pradesh: २१ वर्षांनंतर सरकारी बससेवेचे पुनरागमन; स्वतः तिकीट काढून मुख्यमंत्र्यांनी केला बस प्रवास video viral

Latest Marathi News Live Update : मुंबई-नाशिक महामार्गावर ५ ते ६ किमी वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT