कोकण

चिपळूण-चिपळुणात पावसाचा जोर, महामार्गावर पाणीच पाणी

CD

95507

चिपळुणात महामार्गावर पाणीच पाणी
वाहतूक मंदावली; बाजारपेठेत शुकशुकाट
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ७ः येथे पावसाचा जोर अधिक वाढल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक मंदगतीने सुरू होती. सायंकाळी रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत होता.
गेले दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. अमावस्येला मोठा पाऊस पडेल असा अंदाज असताना सरीवर पाऊस पडत होता. परंतु रविवारी दुपारनंतर पावसाने दणक्यात सुरवात केली. शहरासह सावर्डे, वहाळ, शिरगांव, पोफळी, खेर्डी या भागात काळाकुट्ट अंधार करत पाऊस कोसळत होता. हवामान खात्यानेही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने शासकीय यंत्रणा अलर्ट झाली. प्रांताधिकारी, तहसीलदार व नगरपालिका प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू करून नागरिकांना दक्षतेचे सूचना देणारे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नगरपालिकाही पूरस्थितीशी सामना करण्यासाठी सज्ज आहे.
वाशिष्ठी व शिव या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परंतु या दोन्ही नद्या इशारा पातळीच्या खाली आहेत. त्यामुळे सध्यातरी पुराची शक्यता दिसत नव्हती. परंतु शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे शहरातील अंतर्गत वाहतुकीत अडथळे निर्माण होत होते. साचलेल्या पाण्यातूनच वाहने काढावी लागत होती.
मुंबई-गोवा महामार्गावर पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. आरवली, सावर्डे, डेरवण फाटा, कामथे अशा अनेक ठिकाणी चक्क रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम जाणवत होता. साचलेल्या पाण्यामधून वाहने काढताना चक्क वाहनांमध्ये पाणी येत होते. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. त्याचा परिणाम महामार्गावरील वाहतुकीवर झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT