कोकण

दोडामार्गमध्ये पावसाने दाणादाण

CD

95512

दोडामार्गमध्ये पावसाने दाणादाण

गावे संपर्कहीन ः तिलारीच्या पाणी पातळीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ७ ः तालुक्यात ढगफुटी सदृश झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजविला. तालुक्यातील लहान पूल, कॉजवे पाण्याखाली गेल्याने त्या गावांचा संपर्क तुटला आहे. शेती बागायती पाण्याखाली गेली असून शेतकरी व ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ठिकठिकाणी झाडांची पडझड झाली. दोडामार्ग शहरातील काही अपार्टमेंटच्या आवारात पाणी शिरले. दोडामार्ग-विजघर राज्यमार्गावरील दोडामार्ग बाजारपेठेसह मुख्य रस्त्यावर पाणी आल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले. साटेली-भेडशी येथील नवीन पुलालगतच्या रस्त्यावर व पर्यायी पुलावर पाणी आल्याने वाहतूक झाली. तेरवण-मेढे उन्नैयी बंधाऱ्यातून पाणी विसर्ग वाढल्याने तिलारी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली होती. एकंदरीत पावसाने तालुक्यात दाणादाण उडविली आहे.
दोडामार्ग तालुक्यात मंगळवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आज पावसाने अधिकच जोर धरला. सकाळी तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला. पावसामुळे खराडी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या नदीवर तेरवण मेढे येथे जल विद्युत प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या उन्नैयी बंधाऱ्यातील पाणी पातळी वाढल्याने सातही दरवाजांतून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत या बंधाऱ्यातून २३१.९८ घ.मि. प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू झाला. हे पाणी पुढे तिलारी नदीला येऊन मिळते असल्याने या नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे तिलारी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. इशारा पातळी ४१.६० मीटर असून, नदीची पाणी पातळी ३९.६० मीटर झाली.
तालुक्यातील लहान पूल, कॉजवे पाण्याखाली गेली आहे. यात साटेली-भेडशी, काजुळवाडी, परमे या गावांतील कॉजवेंचा समावेश आहे. त्यामुळे त्या गावांचा तालुक्य़ाशी संपर्क तुटला आहे. तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. शेती बागायतीतही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दोडामार्गचा आज आठवडा बाजार भरला; मात्र पाऊस वाढू लागल्याने गटारातील पाण्याचा प्रवाह वाढला. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरून पाणी वाहू लागले. दोडामार्ग ते विजघर राज्य मार्गावरील दोडामार्ग बाजारपेठ ते उद्यानपर्यंतचा तब्बल ५०० मीटर रस्ता पाण्याखाली गेला. या रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे वाहन चालकांची तारांबळ उडाली. आयटीआय जवळील संरक्षक भिंत कोसळली. दोडामार्ग म्हावळंकरवाडी येथील कॉजवे पाण्याखाली गेला. प्रशासनाने खबरदारी घेत तेथे पोलिस कर्मचारी ठेवला. शिवाय तलाठ्यांनी जागेवर जात प्रत्यक्ष पाहणी केली.
.............
चौकट
साटेली-भेडशी पूल, रस्ता पाण्याखाली
साटेली-भेडशी खालचा बाजार येथे पूर्वीचा कॉजवे पावसाळ्यात कायम पाण्याखाली जायचा. त्यामुळे तेथे कोट्वधी रुपये खर्च करून नवीन पूल बांधला. शिवाय एका मोरीचेही काम केले; मात्र आज झालेल्या मुसळधार पावसामुळे बांधकाम विभागाच्या कामाचे पितळ उघडे पडले. नवीन पुलाच्या दोन्ही बाजूचे रस्ते तसेच पर्यायी मार्गाचा पूल देखील पाण्याखाली गेल्याने वाहतूक तब्बल दीड तास वाहतूक ठप्प होती. पर्यायी पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहने अडकून पडल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला.
...........
घरात पाणी शिरल्याने नुकसान
शहरातील गणपती विसर्जनाच्या ओढ्याला पूर आला‌. पुराचे पाणी लगत असलेल्या अपार्टमेंटच्या परिसरात साचले. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. याखेरीज साटेली भेडशी खालचा बाजार येथील नदीला पूर येऊन फळ बागायतींसह काही ग्रामस्थांच्या घरात शिरल्यामुळे मोठे नुकसान झाले. दोडामार्ग ते बांदा राज्यमार्गावरील जठार बाबा मंदिर परिसरातही गुडघाभर पाणी साचले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 39 लाख; या शेअरने दिला 3900% रिटर्न! अजूनही 80% वाढण्याचा ब्रोकरेजचा अंदाज

IPL 2026: सूर्याला धुरंधरची 'क्रेझ' Video Viral

Shaktipith Highway Sangli : शक्तिपीठ महामार्गातून सांगलीतील १९ गावे वगळली, नवीन मार्ग जयंत पाटलांची डोकेदुखी वाढवणार

Financial Risk Management : शेअर बाजार कोसळला तरी टेन्शन नाही! जोखीम व्यवस्थापनाचे 'हे' सोपे नियम प्रत्येक गुंतवणूकदाराला माहित हवेत

वयाच्या ५७ व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहोल्यावर चढला हा अभिनेता; पत्नीच्या इच्छेसाठी घातला सगळा घाट; लग्नाचे फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT