कोकण

कासार्डेचे दूरक्षेत्र पाण्याखाली

CD

कासार्डेचे दूरक्षेत्र
पाण्याखाली
तळेरे ः मुंबई-गोवा महामार्गावरील कासार्डे दूरक्षेत्र रविवारी पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेले. दरवर्षी ही समस्या जाणवत असून शासन आणि पदाधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. कासार्डे दुरक्षेत्राच्या अंतर्गत बेळने, नांदगाव, कासार्डे, तळेरे, दारुम, ओझरम, असलदे, कोळोशी, आयनल, पियाळी अशी १० गावे येतात. शिवाय या महामार्गावरील एक महत्त्वाचे दूरक्षेत्र आहे. या दूरक्षेत्राच्या मागून ओढा वाहत असून महामार्गाच्या चौपदरीकरण कामाच्या चुकीच्या पद्धतीमुळे दरवर्षी या परिसरात पाणी भरते. यामुळे पूर्णतः सेवा मार्गावरील वाहतूकही बंद होते. याकडे शासन लक्ष देत नाही, पदाधिकारी गांभीर्याने पाहत नाहीत. महामार्ग प्राधिकरणची चूक मात्र प्रवाशी, पादचारी आणि ग्रामस्थांना भोगावी लागत आहे. या परिसरात पाणी साठल्याने आऊटपोस्ट मध्येही पाणी भरते. महामार्ग प्राधिकरणाच्या काही चुकांमुळे अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. यामुळे प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे.
95529

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Edible Oil Import Duty Cut : सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेल होणार स्वस्त; केंद्र सरकारकडून खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी कपात, सामान्यांना दिलासा

धोनीचा असा जल्लोष परत कधीचं पाहिला नाही! पहिला T20 World Cup जिंकल्यावरच्या सेलिब्रेशनचा Viral Video

अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

Congress MLA Resignation : मतदार संघात दुष्काळ जाहीर न केल्याने काँग्रेस आमदार पाटील यांचा राजीनामा

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

SCROLL FOR NEXT