कोकण

पाऊस

CD

आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी
रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाची सद्यस्थिती, बऱ्याच ठिकाणी पुलावरून पाणी वाहत आहे. काही ठिकाणी गावांमधील भागात पाणी आल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये तसेच पूर्वदक्षता म्हणून उद्या (ता. ८) प्राथमिक, माध्यमिक शाळांना तसेच महाविद्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासानाकडून घेण्यात आला आहे.

चांदेराई बाजारपेठेत
पुराचे पाणी शिरले
मुसळधार पावसामुळे रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पुराचे पाणी चांदेराई बाजारपेठेत शिरण्यास सुरुवात झाली आहे. सायंकाळनंतर पाण्याची पातळी प्रचंड वेगात वाढू लागली. चांदेराई बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली होती. व्यापाऱ्यांनी दुकानातील साहित्य सुरक्षितस्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षीची ही समस्या सुटणार कधी असा प्रश्न येथील नागरिक करीत आहेत.

परशुराम घाटात
कोसळली दरड
मुसळधार पावसात परशुराम घाटात रात्री ८ च्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे काही काळ धिम्या गतीने वाहतूक सुरू होती. काही वेळात जेसीबीच्या साहाय्याने दरड हटविण्यास सुरुवात झाली. वाशिष्ठी नदीची पाणी पातळी ९ च्या सुमारास इशारा पातळीपर्यंत (केवळ१० सेंमी कमी) पोहोचली होती. पुराच्या शक्यतेमुळे प्रशासनाने आपद्‍कालीन पथके तैनात केली आहेत. नियुक्त केलेले अधिकारी पालिकेतील कंट्रोल रूमसह संबंधित ठिकाणी पोहोचले होते. व्यापाऱ्यांना दुकानातील साहित्य सुरक्षितस्थळी हलविण्याच्या सूचना पालिकेने दिल्या. वाशिष्टीची पातळी वाढल्याने कोळकेवाडी धरणातून वीज निर्मिती बंद केली होती. प्रांताधिकारी आकाश लिगाडे आपत्ती बाबत सातत्याने आढावा घेऊन नागरिकांना सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन करीत होते.


सुसेरी पूल पाण्याखाली
जगबुडी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान सायंकाळी ७.३० च्या सुमारास जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी वाढली. नारंगी नदीला पूर आल्याने खाडीपट्ट्याकडे जाणारा सुसेरी पूल पाण्याखाली गेला असून संततधार पावसामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. खेड - दापोली रस्त्यावरील सुर्वे इंजिनिअरींगजवळ पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

कळंबोलीत रेल्वे रूळावर पाणी
नवी मुंबईतील पनवेलसह कळंबोली परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा परिणाम आता कोकण रेल्वेवर झाला आहे. कळंबोली येथे रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. त्यामुळे याचा परिणाम कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांवर झाला आहे. मुंबईकडे येणारी मेंगलोर एक्सप्रेस रखडली असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना रद्द, १९४६ ला सुरू झालेल्या बँकेला RBIचा दणका

भारतीयांनो लगेच इराण सोडा! युद्धविरामानंतर तेहरानमधील दुतावासाचा इशारा, हेल्पलाइन नंबर जारी

दीपिकाने धर्म बदलून केलेलं दुसरं लग्न; आता मुलाला नमाज शिकवत आहे अभिनेत्री, भावूक होत म्हणते....

Latest Marathi News Live Update: तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करण्याच्या मागणीवरून नांदेडमध्ये आंदोलन

Gratuity Money: तुमचा हक्काचा पैसा! ग्रॅच्युइटी कशी मिळते? कॅल्क्युलेशन आणि Tax नियम जाणून घ्या

SCROLL FOR NEXT