कोकण

कलमठ गावडेवाडीतील घरांमध्ये पुराचे पाणी

CD

M95540

कलमठ गावडेवाडीतील
घरांमध्ये पुराचे पाणी
सरपंच संदीप मेस्त्री यांच्याकडून पाहाणी
कणकवली, ता. ८ : रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने कणकवली तालुक्यातील कलमठ गावडेवाडी भागामध्ये काही घरांमध्ये पाणी घुसले. त्‍यामुळे नागरिकंची धावपळ उडाली होती. रात्री अकरानंतर पावसाचा जोर कमी झाला. त्‍यामुळे घरातील पाणी ओसरले अणि नागरिकांना दिलासा मिळाला.
गावडेवाडीतील घरांमध्ये पाणी घुसल्‍याचे वृत्त समजताच कलमठचे सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, तेजस लोकरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच लोकांना धीर दिला. तर महसूल विभागाला याबाबत माहिती दिल्‍यानंतर गावडेवाडी येथे नायब तहसीलदार मंगेश यादव, मंडळ अधिकारी मेघनाथ पाटील, तलाठी सुवर्णा कडूलकर यांनी देखील कलमठ मध्ये भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच इथल्‍या नागरिकांच्या स्थलांतरासाठी पर्यायी व्यवस्था केली होती. मात्र रात्री ११ नंतर पावसाचा जोर ओसरल्याने पुराच्या पाण्याची पातळी कमी झाली तसेच घरातील पाणी निचरा होऊ लागल्‍याने नागरिकांना दिलासा मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune ZP President Election : पुणे जिल्हा परिषदेसाठी अखेर अध्यक्ष-उपाध्यक्षपदाचे उमेदवार ठरले; दोन्ही पदे राष्ट्रवादीकडेच राहणार

नोराचं अश्लील गाणं लिहिणाऱ्या गीतकाराला चक्क मिळालाय ऑस्कर! प्रकरण अंगावर आल्यास पलटला, 'या' व्यक्तीवर फोडलं खापर!

Pune Crime News : धक्कादायक घटनेने पुणे हादरले ! समलिंगी संबंधाला विरोध केल्याने १२ वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या, संशयित तरुण ताब्यात

Latest Marathi News Live Update : सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडीला सुरुवात

Kavya Maran: '२.३४ कोटी पाकिस्तानी खेळाडूवर खर्च...' काव्या मारनला ललित मोदींचा नाव न घेताही स्पष्ट मेसेज

SCROLL FOR NEXT