कोकण

मुख्याध्यापक संजय नाईकांना पेंडूर ग्रामस्थांतर्फे आदरांजली

CD

मुख्याध्यापक संजय नाईक यांना
पेंडूर ग्रामस्थांतर्फे आदरांजली
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ८ : मुख्याध्यापक संजय नाईक यांच्या निधनाने पेंडूर गावासह संपूर्ण पंचक्रोशीत कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली. आपल्या प्रेमळ स्वभावामुळे अनेकांच्या हृदयात त्यांनी आदराचे स्थान निर्माण केले होते, अशी भावना पेंडूर येथील शोकसभेत व्यक्त करण्यात आली. पेंडूर गावचे माजी सरपंच, वराडकर हायस्कूल, कट्टाचे मुख्याध्यापक तसेच सर्व क्षेत्रांत तळमळीने काम करणारे संजय नाईक यांचे ३० जूनला निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी (ता. ६) खरारे-पेंडूर ग्रामपंचायत सभागृहात पेंडूर ग्रामस्थ व संजय नाईक मित्रमंडळ यांच्यावतीने शोकसभा आयोजित करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी नाईक यांच्या आठवणींना उजाळा दिला. ज्येष्ठ नागरिक बाबा पराडकर यांनी गावाच्यावतीने नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी डॉ. सोमनाथ परब, समीर चांदरकर, ॲड. प्रदीप मिठबावकर, कृतिका लोहार, वैष्णवी लाड, अर्जुन पेंडूरकर, अमित रेगे, सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी संतोष गावडे, संतोष राणे, बाळू राणे, अमोल गोसावी, अनिल सावंत, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी मळगावकर, पेंडूरच्‍या सरपंच स्नेहा परब, उपसरपंच सुमित सावंत, रवींद्र शिरसाट, दीपा सावंत, आतिक शेख, शेखर फोंडेकर, अमित रेगे, सुनीता मोरजकर, संतोष परब, रामू सावंत, अमित सावंत, बाळू राणे, शाम आवळेगावकर, संदीप सरमळकर, दीपक गावडे, मंगेश माडये, प्रदीप आवळेगावकर, नीलेश हडकर, सुरेश कांबळी, प्रकाश सरमळकर, दादा वायंगणकर, विष्णू लाड, मनोज राऊळ, नितीन राऊळ, संतोष राणे, सत्यवान दळवी, उत्तम परब, अनिल सावंत, दादा गावकर, न्हानू पेंडूरकर, सत्यवान पाटील, अनिल पाटील, प्रदीप वालावलकर, विकास जाधव, रवी गावडे, ग्रामस्थ व मित्रमंडळींसह मुख्याध्यापक नाईक यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेकांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

९५५८७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT