कोकण

कुडाळात आमदार नाईकांकडून आढावा

CD

95650

आमदार नाईकांकडून
नुकसानीची पाहणी
कुडाळमध्ये तलाठ्यांना पंचनाम्याच्या सूचना
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ८ ः पूरस्थितीमुळे कुडाळ तालुक्यात झालेल्या नुकसानीची आमदार वैभव नाईक यांनी आज पाहणी केली. ''एनडीआरएफ''च्या टीम समवेत पूरग्रस्त भागाला त्यांनी भेट दिली.
अतिवृष्टीमुळे तालुक्यात रविवारी (ता. ७) ठिकठिकाणी पूरस्थिती उद्भवल्याने नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले. पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे शेतीचे देखील नुकसान झाले. आमदार नाईक यांनी आज पुन्हा तालुक्यात विविध ठिकाणी भेट देऊन नुकसानीची पाहणी करून आढावा घेतला. काही ठिकाणी पंचनामे झाले नाहीत, तेथे तलाठ्यांना पंचनाम्याच्या सूचना दिल्या.
आपद्ग्रस्त नागरिकांना तातडीने मदतकार्य करण्यात जिल्ह्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कमी पडल्याने आमदार नाईक यांनी रविवारी संताप व्यक्त केला होता. जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना त्याचा जाब विचारण्यात आला होता. त्यानंतर प्रशासनाकडून आज एन.डी.आर.एफ.ची टीम कुडाळ येथे पाठविण्यात आली. या टीमसोबत आमदार नाईक यांनी पावशी, हुमरमळा, डिगस, कसाल यांसह पूरस्थिती उद्भवलेल्या भागाची पाहणी केली. तसेच आपद्ग्रस्त नागरिकांना मदतकार्य करून त्यांची विचारपूस करण्यात आली. यावेळी संजय पडते, अमरसेन सावंत, बबन बोभाटे, बाळा कोरगावकर, राजू कविटकर, अजित परब, अतुल बंगे, कौशल जोशी, सचिन काळप, उदय मांजरेकर, अमित राणे, गुरु गडकर, गोट्या चव्हाण आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहली, शुभमन गिलचे शतक, टीम इंडियाचा पहिल्या वन डेत दणदणीत विजय; मालिकेत आघाडी

Praniti Shinde: दुष्काळ जाहीर केला, पण आर्थिक मदत कुठे?’; मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदेंचा सरकारवर निशाणा

Nagpur Crime: साक्ष दिल्याचा बदला घेण्यासाठी पाठलाग; हद्दपार आरोपीने तेलमालिश करणाऱ्यावर चाकूने केले तीन वार

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीची Century! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; ७४ चेंडूंत इतिहास भूगोल बदलला...

SCROLL FOR NEXT