कोकण

केसरकरांना शिक्षण खाते समजलेच नाही

CD

95688

केसरकरांना शिक्षण खाते
समजलेच नाहीः रूपेश राऊळ
राजन तेलींच्या आरोपांचे समर्थन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १०ः मंत्री दिपक केसरकर यांना शिक्षण खाते समजले नाही, असे म्हणून त्यांच्याच मित्र पक्षाचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी चांगलीच चपराक दिली आहे. त्यामुळे केसरकर यांना थोडीशी जरी नैतिकता असेल तर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी टिका उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केली.
श्री. राऊळ यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, केसरकर यांना त्यांच्याच मित्र पक्ष भाजपचे तेली यांनी शिक्षण खाते समजत नसेल तर मंत्री पदावरून पायउतार व्हावे, असे म्हटले आहे. त्यामुळे केसरकर यांनी नैतिकता दाखवून राजीनामा दिला पाहिजे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये पुराचा फटका सावंतवाडी तालुक्याला बसतो. यामध्ये बांदा परिसर व तेथील बाजारपेठ व्यापारी वर्गाचा समावेश आहे. मात्र, प्रशासन, शासन यंत्रणा याबाबत कायमस्वरूपी मार्ग काढण्यास कुचकामी ठरली आहे. नुकसानीबाबत केसरकर यांनी नेहमीच आश्वासनाचे गाजर दाखवले आहेत. विविध यंत्रणा राबवत आहोत, असेही त्यांनी वेळोवेळी म्हटले आहे. परंतु, त्यांनी आजपर्यंत काहीच केले नाही. ते मुंबईमध्ये निवासी झाले आहेत. त्यामुळे लोकांच्या अडीअडचणीला आमदार धावून जात नाहीत, अशा तक्रारी आहेत.
ते पुढे म्हणाले, ‘‘आतापर्यंत अनेक आश्वासने, घोषणा केसरकर यांनी केल्या. पण, बेरोजगारांना वाऱ्यावर सोडले. शिक्षणमंत्री असतानाही डीएड बीएड तरुणांना वाऱ्यावर सोडून दिले. जिल्ह्यातील दीडशेहून शाळा नादुरुस्त आहेत. विद्यार्थी गळत असलेल्या वर्गामध्ये बसत आहेत. शिक्षण मंत्री हे सिंधुदुर्गातील आहेत. फक्त घोषणा, खोट्या आशेवर लोकांना भूलभुलैया करत आहेत. पूरस्थितीत आमदार वैभव नाईक रस्त्यावर उतरून लोकांच्या मदतीला धावून गेले तर केसरकर सावंतवाडीमध्ये असूनही बांदा पूरस्थिती, होडावडा, तळवडे, सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्यातील नागरिकांच्या साधी विचारपूस करायला गेले नाहीत. त्यामुळे केसरकर यांचे खायचे आणि दाखवायचे दात जनतेला कळले आहेत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT