कोकण

वेंगुर्ले तालुक्यात पूर परिस्थिती

CD

95691
95692
95693


वेंगुर्ले तालुक्यात पूर परिस्थिती
नदी, ओहोळ तुडुंब ः वाहतूक विस्कळीत, भातशेतीचे मोठे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ८ ः तालुक्यात रविवारी (ता. ७) सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. तालुक्यातील सर्वच नदी, ओहोळ यांच्या पाण्याची पातळी वाढल्याने हे पाणी रस्त्यावर येऊन वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. काही ठिकाणच्या ओहोळांचे पाणी आजूबाजूच्या शेती, बागायतीमध्ये घुसल्याने सर्व भातशेती पाण्याखाली गेली.
गेले आठ दिवस तालुक्यात अधूनमधून पाऊस सुरू होता; मात्र रविवार सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसाची संततधार अद्याप सुरू होती. आज दुपारपर्यंत पडलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यात ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. वेंगुर्ले तुळसमार्गे सावंतवाडी मुख्य रस्त्यावरील तळवडे-होडावडा पुलावर रविवारपासून पाणी असल्याने या मार्गाने वाहतूक बंद होती. आज दुपारी पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने दुपारी दोन वाजल्यानंतर या पुलावरील पाणी ओसरून वाहतूक सुरळीत झाली.
तालुक्यातील सर्वच नदी व ओहोळ दुथडी भरून वाहत असल्याने पाणी आजूबाजूच्या शेती आणि बागायतींमध्ये शिरले. त्यामुळे परिसर जलमय झाला होता. वेंगुर्ले नगरवाचनालय नजिक असलेल्या साकवाचे पाणी शेजारील घरांच्या अंगणात आले होते. साकव पुलानजिक असलेला कॉम्प्लेक्स आवारही जलमय झाला होता. मानसीश्वर देवस्थान, एसटी बसस्थानक आणि कॅम्प परिसरही पाण्याने वेढला गेला होता. तुळस-पलतड येथील नदीला पूर आल्याने हे पाणी शेजारी असलेल्या रस्त्यावर येऊन ग्रामस्थांच्या सहाय्याने वाहतूक सुरू होती. दरम्यान, या पावसामुळे सायंकाळ उशिरापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानीची नोंद झाली नसल्याची माहिती तहसील आपत्ती विभागाकडून देण्यात आली.

चौकट
प्रशासनाकडून पाहणी
यावेळी आज वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी, पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांनी होडावडा आणि तुळस येथे पूरग्रस्त भागाची पाहणी केली. तळवडे-होडावडा पुलाच्या बाजूला राहत असलेल्या ब्रिटो कुटुंबीयांना पुरात वाढ झाल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या. परुळे कर्लीवाडी येथे प्रशासनामार्फत प्रत्यक्ष जाऊन अतिवृष्टीची पाहणी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Supplement Alert: खळबळजनक! Amazon वरून खरेदी केलेल्या गोळ्यांमध्ये आढळलं विष; वापर थांबवण्याचं आवाहन

रोहित शर्माने पूर्ण केलं संजू राठोडचं स्वप्न, 'हिटमॅन'सोबतचा व्हिडिओ शेअर करत म्हणाला...'लहानपणीचं स्वप्न...' Viral Video

Akola News : अकोल्यात 'ऑपरेशन टायगर' फत्ते; पक्षाच्या वाढीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे- माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया

आनंदाची बातमी! नागरिकांना घरबसल्या मिळणार दस्ताची प्रमाणित प्रत; राज्यभर राबवण्यात येणार, नेमकी काय आहे सुविधा?

Mumbai Crime: मुंबईत रागातून २ अल्पवयीन मुलांनी मित्राला संपवलं, नंतर हातपाय धुवून मृतदेहाशेजारीच झोपले अन्...; कारण काय?

SCROLL FOR NEXT