कोकण

देवगडमध्ये पावसामुळे पडझड़

CD

95767
95768

देवगडमध्ये पावसामुळे पडझड
१३ लाखांचे नुकसानः मोंडमध्ये दरड रस्त्यावर
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ८ : विश्रांतीनंतर सुरू झालेल्या धुवाँधार पावसाने तालुक्यात विविध भागात पडझड झाली. तालुक्यात विविध भागात मिळून सुमारे १३ लाख ८२ हजार २०० रुपयांचे नुकसान झाले. गेल्या चोवीस तासात आज सकाळपर्यंत येथे यंदाच्या हंगामातील सर्वाधिक १९८ मिलीमीटर इतका पाऊस झाला. पावसाने मोंडमध्ये दरड कोसळून दगड रस्त्यावर आले होते. शिरगांवमध्ये इमारतीच्या छप्पराचे नुकसान झाले. नुकसानीची माहिती स्थानिक यंत्रणेने घेतली.
गेल्या चोवीस तासात तालुक्याच्या किनारी भागाला वादळी वाऱ्यासह जोराच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. सततच्या पावसामुळे मोंड येथे दरड खाली येऊन रस्त्यावर मोठे दगड आले होते. धालवली भागात पुराच्या पाण्याची पातळी वाढली होती. नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर यांनी या भागाची पाहणी केली. शिरगांव येथील सोसायटीच्या इमारतीच्या छपराचे नुकसान झाल्याने पाणी आतमध्ये येऊन आतील खत तसेच धान्य भिजले. जामसंडे खाकशी भागात घराची संरक्षक भिंत कोसळून तसेच पायवाट कोसळून मोठे नुकसान झाले. नुकसानीची स्थानिक यंत्रणेने पाहणी केली. रहाटेश्‍वर कालवीवाडी येथील रस्त्यावरून पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. वाडा परिसरात पुराचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने वाहतूक खोळंबली. देवगड-नांदगाव रस्त्यावर जामसंडे येथे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुकीला अडथळा होत होता.
यंदाच्या हंगामातील सर्वाधिक पावसाची आज नोंद झाली. दोन दिवसांत मिळून तालुक्यात सुमारे १३ लाख ८२ हजार २०० रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये शिरगांव परिसरात घरे, गोठे मिळून सुमारे ३ लाख १५ हजार ७०० रुपयांचे, दाभोळे भागात सुमारे २ लाख ९१ हजार १५० रुपयांचे, मालपेवाडी येथे घरावर झाड पडून सुमारे ३० हजाराचे, किंजवडे येथे संरक्षक भिंत कोसळून सुमारे दोन लाखांचे, जामसंडे कट्टा येथे घरावर माती कोसळून सुमारे ४० हजारांचे, तोरसोळे येथे घराचे छप्पर कोसळून सुमारे ५० हजाराचे, हिंदळे येथे पाणी घरात घुसून घरातील साहित्याचे सुमारे ३७ हजार ६५० रुपयांचे, मुणगे येथे घराचे सुमारे २ लाख २० हजारांचे तर जामसंडे येथे संरक्षक भिंत कोसळून सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याची माहिती येथील तहसीलदार कार्यालयातील महसूल यंत्रणेने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT