कोकण

तळकट-बांदा मार्गावर पडलेले झाड हटविले

CD

95751

तळकट-बांदा मार्गावर
पडलेले झाड हटविले
सकाळ वृत्तसेवा
कोलझर, ता. ८ः तळकट-बांदा मार्गावर पडलेले काजूचे झाड तळकट येथील युवकांनी श्रमदानातून बाजूला केले. दोन-तीन दिवस सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी झाडे पडून नुकसान झाले. काहींच्या घरावर झाडे पडून तर काही ठिकाणी रस्त्यावर झाडे पडून वाहतूक खोळंबली होती. तळकट-बांदा मार्गावर तळकट-गोठणवाडी या ठिकाणी आज सकाळी काजूचे मोठे झाड पडून वाहतूक विस्कळीत झाली. याची माहिती तळकट सरपंच सुरेंद्र सावंत-भोसले यांना मिळताच त्यांनी आपल्या मित्र परिवारासह हे झाड बाजूला केले व वाहतूक सुरळीत केली. आज सोमवार असल्यामुळे बांदा आठवडा बाजारासाठी जाणाऱ्या वाहनांची दोन्ही बाजूंनी रांग लागली होती. हे झाड लागलीच बाजूला केल्यामुळे सरपंच सावंत-भोसले व त्यांचे सहकारी नारायण राऊळ, रजत देसाई, विकास सावंत, बंड्या राऊळ, साहिल नांगरे, प्रज्योत देसाई, चंद्रहास राऊळ, बाबल गवस आदींचे ग्रामस्थ व वाहनचालकांनी आभार व्यक्त केले.
.................
चौकट
धोकादायक झाडे तोडण्याची मागणी
तळकट-बांदा मार्गावर तळकट वनविभागाची झाडे उन्मळून रस्त्यावर पडण्याच्या स्थितीत आहे. यामुळे वाहतुकीस अडथळे होऊन अपघाताचीही शक्यता नाकारता येत नाही. ही धोकादायक झाडे वनविभागाने तत्काळ हटवावी, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने तळकट सरपंच सुरेंद्र सावंत-भोसले यांनी केली आहे.
..............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT