कोकण

चिपळुणात ऐन पावसाळ्यात पाणीसंकट

CD

ऐन पावसाळ्यात
चिपळुणात पाणीसंकट

चिपळूण, ता. ८ : शहरातील गोवळकोट तिठा परिसरात मोठ्या पऱ्यामध्ये असणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने पावसाळ्यात चिपळूण शहरातील अर्ध्या भागावर पाणीसंकट निर्माण झाले आहे. या पऱ्याला पाणी अधिक असल्याने दुरुस्तीचे काम लांबणीवर पडणार असल्याने मुरादपूर, पेठमाप, गोवळकोट रोड, उक्ताड भागातील पाणीपुरवठा अनिच्छित काळासाठी बंद राहणार आहे.चिपळूण शहरातील गोवळकोट टाकीवरून जाणारी १२ इंचाची मुख्य जलवाहिनी गोवळकोट तिठा येथे सातत्याने फुटते. रविवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे नदी, नाले, पऱ्हे यांची पाणीपातळी वाढली आहे. अशातच पुन्हा गोवळकोट येथे मुख्य पाईपलाईन फुटण्याचा प्रकार घडला. पऱ्याला पाणी असल्याने पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला येथे जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेणे अवघड झाले आहे. त्यामुळे शहरातील अर्ध्या भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Suryakant : लडाखमध्ये नवं न्यायालय सुरू; दुर्गम भागात न्याय मिळणं होणार सोपं, CJI सूर्यकांतांचं मोठं विधान

Chhatrapati Sambhajinagar: ना होर्डिंग, ना डीजे, तरीही जयंती दणक्यात साजरी!; महावीर जयंतीनिमित्त जैन समाजाने घालून दिला आदर्श

New Rules From April 1 India : देशात आजपासून अनेक कायदे आणि नियमांत बदल होणार, डिजीटल पेमेंटसाठी कडक सुरक्षा

Latest Marathi News Live Update : हवाई दलासाठी पर्वतीय रडारची खरेदी

आनंदाची बातमी! विद्यार्थिनींना मिळणार दोन हजार विद्यावेतन: चंद्रकांत पाटील यांची घोषणा, ‘कमवा आणि शिका’ उपक्रम

SCROLL FOR NEXT