कोकण

झाडे वाढवण्यासाठी सीड बॉलसारखे उपक्रम राबवा

CD

- rat९p९.jpg-
P२४M९५८४१
रत्नागिरी : अ. के. देसाई हायस्कूल येथे सामाजिक वनीकरण विभाग, कांदळवन संवर्धन विभागाच्यावतीने वृक्षारोपण करताना अधिकारी, विद्यार्थी.

झाडे वाढवण्यासाठी ‘सीड बॉल’सारखे उपक्रम राबवा

स्नेहल अडसूळ ः वनमहोत्सवानिमित्त रत्नागिरीत वृक्षदिंडीचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : झाडे आपल्याला कोट्यवधी रुपयांचा ऑक्सिजन मोफत देतात. त्यामुळे झाडांच्या जगण्यातच आपलं जगणं आहे. त्यासाठी झाडांची संख्या वाढली पाहिजे तरच पृथ्वीचा समतोल टिकून राहील. वृक्षारोपण केलेली झाडे जगली पाहिजेत त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा. झाडांची संख्या वाढवण्यासाठी सीडबॉलसारख्या उपक्रमाचे आयोजन प्रशालेत करण्यात येईल, असे स्नेहल अडसूळ यांनी सांगितले.
सामाजिक वनीकरण विभाग, कांदळवन संवर्धन विभाग आणि मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूलचा राष्ट्रीय हरितसेना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वनमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी वृक्षदिंडी काढण्यात आली. या दिंडीत पाचवी ते दहावीचे विद्यार्थी व राष्ट्रीय हरितसेनेचे विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. वृक्षदिंडीची पालखी सजवून त्यामध्ये झाडांची रोपे ठेवून त्यांची वाजतगाजत घोषणा देत मिरवणूक काढण्यात आली. वृक्षदिंडीची पालखी मुख्याध्यापिका प्रज्ञा दळी व सामाजिक वनीकरणाच्या अधिकारी अडसूळ यांनी आपल्या खांद्यावर घेऊन वृक्षदिंडीला सुरवात केली. दिंडीद्वारे झाडे लावा झाडे जगवा, अशा घोषणा देऊन विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश दिला. त्यानंतर शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
या वेळी वनपाल नीलेश कुंभार, वनरक्षक मिताली कुबल, शर्वरी कदम, प्रभू साबणे, कांदळवन वनरक्षक किरण पाचारणे, स्वस्तिक गावडे विशेष उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शर्वरी कदम, संतोष गार्डी, जयसिंग लोहार, सचिन मोहिते यांनी केले.
------------
वृक्ष जगवण्याची विद्यार्थ्यांकडून ग्वाही

राष्ट्रीय हरितसेनेच्या विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात वृक्षारोपण केले आणि ही झाडे नक्कीच जगवू, असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. रणजीत सुवारे यांनी वृक्षदिंडी, वृक्षारोपण या उपक्रमांचे स्वागत करून हायस्कूलला काही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली. या वेळी माजी विद्यार्थी रणजीत सुवारे व अच्युत गजबिये उपस्थित होते तसेच माजी विद्यार्थ्यांतर्फे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटपही करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT