कोकण

नीलेश राणेंनी केली आंबेरी पुलाची पाहणी

CD

95991

नीलेश राणेंनी केली
आंबेरी पुलाची पाहणी
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १०ः सिंधुदुर्गात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील माणगाव खोऱ्याला जोडणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या निर्मला नदीवरील आंबेरी येथील जुन्या पुलाचा काही भाग खचून वाहतूक बंद झाली होती. या ठिकाणी नवीन पूल उभारणी होऊन देखील जोडरस्ते व इतर काही अडचणींमुळे हा पूल वाहतुकीसाठी अद्याप खुला झालेला नाही.
या पार्श्वभूमीवर आज भाजपा नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी आंबेरी येथे भेट देऊन पुलाची पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पुलाच्या बांधकामासंदर्भात सर्व माहिती घेऊन नव्याने बांधकाम झालेला पूल वाहतुकीसाठी खुला व्हावा, यासाठी जोडरस्त्यांची कामे तत्काळ पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी कुडाळ मंडल संजय वेंगुर्लेकर, माजी सभापती मोहन सावंत, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, राजा धुरी, जोसेफ डान्टस, सचिन धुरी, दीपक काणेकर, कृष्णा सावंत, दीपक खरात आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon 2026: पावसाचा वेग मंदावला! अरबी समुद्रातील कोरडे वारे, बंगालचे बाष्प प्रशांत महासागराकडे, हवामानशास्त्रज्ञांनी नेमकी काय सांगितली कारणे?

Police Constable Death : चंदगड हादरलं! 42 वर्षीय पोलिसानं स्वत:वर गोळी झाडून संपवलं आयुष्य; लष्करात 17 वर्षे बजावलीये सेवा, सध्या मुंबईत होते कार्यरत

शिवसेनेत पुन्हा भूकंप! ६ खासदार फुटण्याची भीती, उद्धव ठाकरे गट सक्रिय; अरविंद सावंतांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र

Pune 11th Admission: शिक्षण विभागाचा ‘रात्रीस खेळ चाले’! अकरावीच्या दुसऱ्या फेरीची प्रवेशनिश्‍चिती रात्री नऊपर्यंत, पालकांमध्ये संभ्रम

Argentina vs Algeria : १९६६ नंतर कोणालाच नाही जमले, ते लिओनेल मेस्सीने केले... १ गोल अन् ५ भन्नाट विक्रम, पेले यांचाही पराक्रम मोडला

SCROLL FOR NEXT