शिवसेनेत पुन्हा भूकंप! ६ खासदार फुटण्याची भीती, उद्धव ठाकरे गट सक्रिय; अरविंद सावंतांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र

खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करू नये यासाठी ठाकरे गटाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवलं आहे.
uddhav thackeray eknath shinde

uddhav thackeray eknath shinde

esakal

Updated on

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ९ पैकी ६ खासदार फुटल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू होती. आता यावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं म्हटलं जातंय. ठाकरेंचे खासदार फोडण्यासाठी ऑपरेशन टायगर राबवलं जात असून ठाकरेंचे सहा खासदार दिल्लीत दाखल झाले आहेत. स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी ते लोकसभा अध्यक्षांना पत्र देणार असल्याची माहिती समोर येतेय. दरम्यान, खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करू नये यासाठी ठाकरे गटाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवलं आहे. Arvind Sawant Moves to Counter Split Speculation

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com