कोकण

खराब रस्ते न सुधारल्यास आंदोलन

CD

खराब रस्ते न सुधारल्यास आंदोलन

नीलेश आखाडे : रत्नागिरी पालिकेला निवेदन

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : मागील वर्षभरामध्ये शहरातील मुख्य रस्ता साधारणपणे दोन ते तीनवेळा डांबरीकरण करण्यात आला; मात्र या रस्त्यांवरील खडी वर येऊन या रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. दररोज या रस्त्यांवर अपघात घडत आहेत. पुढील आठ दिवसांत याबाबत उपाययोजना न झाल्यास संपूर्ण शहरातील रस्त्यावरील खडी नगरपालिका कार्यालय बाहेर आणून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजप आयटी सेलचे जिल्हा संयोजक नीलेश आखाडे यांनी दिला आहे.
खराब रस्त्यांवर ठोस उपाययोजना झाल्यास आंदोलन करण्याचा तसेच ही परिस्थिती ओढवण्यास दोषी कोण आहे हे नगरपालिकेने जाहीर करावे, अशीही मागणी केली आहे. आखाडे यांनी या संबंधीचे निवेदन नगरपालिकेला दिले आहे. शहरातील अनेक प्रश्न जैसे थे आहेत. शहरातील मुख्य रस्त्यांबरोबर अंतर्गत रस्त्यांचीदेखील दुरवस्था झाली आहे. वेगवेगळ्या कारणाने खोदण्यात आलेले चरदेखील बुजवण्यात आलेले नाहीत. याबाबत रत्नागिरी नगरपालिकेकडे व्यवस्थाही नसल्याचे दिसून येत आहे.
नगरपालिका प्रशासनाने दोन ते तीनवेळा रस्ते करून देखील रस्त्यांची ही अवस्था होत असेल तर यावर नेमकं दोषी कोण? याची जबाबदारी कोण स्वीकारणार..? हे जाहीर करावे आणि रस्त्याच्या वर आलेली खडी त्वरित उचलावी आणि रत्नागिरी शहरवासियांना रस्त्यांची किमान दुरुस्ती करून दिलासा द्यावा, अशी मागणी भाजप आयटी जिल्हा संयोजक आखाडे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati By Election : सुनेत्रा पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज ; अजितदादांच्या आठवणीने डोळ्यांत तरळले अश्रू

CCTV Rules 2026 : काय भारतात लाखो CCTV कॅमेरे सुरक्षित आहेत? Qubo CEO नी दिला हॅकिंगचा इशारा, तुमचा कॅमेरा सेफ आहे का? 'असे' करा चेक

Satara Politics : भाजपची 'अफाट' किमया! संख्याबळ कमी असतानाही साताऱ्यात सत्ता कशी मिळवली? वाचा सविस्तर इनसाईड स्टोरी

राष्ट्रावादीच्या मेळाव्यात बॅनरवर शरद पवारांचा फोटो, तर चाकणकर अनुपस्थित; चर्चांना उधाण

लग्नापाठोपाठ गौरव मोरेने दिली आणखी एक गुड न्यूज ! पवईतील ड्रीम हाऊसमध्ये केला गृहप्रवेश ; नेमप्लेट चर्चेत

SCROLL FOR NEXT