कोकण

पिंपळीतील भंगार गोदाम जैसे थे

CD

-rat९p२३.jpg -
२४M९५८७३
चिपळूण ः पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने जलमय झालेला घराशेजारील परिसर
------------

पिंपळीतील भंगार गोदाम जैसे थे

पावसाचे पाणी राहते अडून ; रहिवाशांना त्रास
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ९ ः तालुक्यातील पिंपळीखुर्द येथील समर्थ नगरमध्ये महामार्गालगत उभारलेल्या भंगाराच्या गोदामामुळे पावसाचे पाणी वाहून जात नाही. याबाबत येथील रहिवाशांनी सातत्याने चार वर्षापासून प्रशासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा केला. त्यानुसार प्रशासनाने सदरचे बांधकाम तोडण्याचे आदेशही दिले. त्यानंतरही गोदाम जैसे थे आहे. परिणामी, यावर्षी देखील येथील रहिवाशांना पावसाळ्यात नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
चिपळूण-कराड मार्गावर पिंपळीखुर्द समर्थनगरमधील जगदीश इंदुलकर यांनी या भंगार गोदामाची तक्रार केली होती. त्यांनी पिंपळीखुर्द ग्रामपंचायत, चिपळूण पंचायत समिती, तहसीलदार यांच्याकडेही लेखी निवेदन देत समस्या मांडली. या गोदामास ग्रामपंचायतीने बांधकामाला परवानगी दिलेली नाही. पावसाळ्यात येथील घरांकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते. पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी, येथील वयोवृद्धांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पावसाळ्यात येथील पाण्याचा निचरा होत नसल्याने इंदुलकर यांनी प्रशासकीय यंत्रणेकडे धाव घेतली. त्यानुसार भंगार गोदामाची सविस्तर चौकशी झाली. कारवाई होत नसल्याने इंदुलकर यांनी महाराष्ट्र राज्य मानव एकाधिकार समितीकडे धाव घेतली. त्यानुसार या समितीने प्रशासकीय यंत्रणेला त्वरित कारवाईच्या सूचना केल्या. त्याप्रमाणे तहसीलदारांनी गोदाम मालकास स्वखर्चाने बांधकाम पाडण्याचा सूचना तीन महिन्यापूर्वीच दिल्या होत्या; मात्र अद्याप बांधकाम हटविण्यात आलेले नाही. परिणामी, समर्थ नगरमधील जगदीश इंदुलकर यांच्यासह शिंदे, मोरे, जाधव, देसाई कुटुंबीयांना पावसाळ्यात पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मुसळधार पावसात येथील घरांकडे जाणाऱ्या मार्गावर पाणी साचत असल्याने वयोवृद्धांना घरातच अडकून पडावे लागते. तहसीलदारांनी बांधकाम पाडण्याबाबत दिलेल्या आदेशाविरोधात भंगार व्यावसायिकाने खेड सिव्हिल कोर्टात स्थगितीसाठी याचिका दाखल केली आहे. सद्यःस्थितीला गोदामालगतच्या भागातील पाण्याचा निचरा होत नसल्याने यावर्षीच्या पावसाळ्यात येथील कुटुंबीय हैराण झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missing Link Accident: मिसिंग लिंकवर काळरात्र! आधी पिकअप पलटी, नंतर बस-ट्रकची जोरदार धडक, ६ ते ७ जण जखमी

Inspirational Story: दोन्ही हात नसतानाही हार मानली नाही; माउली बनली महापालिकेची लिपिक, औक्षणाचा क्षण ठरला भावनिक

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

नवरा-मुलीचा मृत्यू, समाजाचे टोमणे अन् डोळ्याला दुखापत; तरीही RAS मध्ये मिळवलं मोठं यश.... रोहिणी गुर्जर यांची जिद्दीची कहाणी

Maharashtra Weather : ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम, मात्र काही जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट; जाणून घ्या IMD चा अंदाज

SCROLL FOR NEXT