कोकण

नडगिवे शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतला भात लावणीचा आनंद

CD

९५९३४
नडगिवे शाळेच्या विद्यार्थ्यांनी
घेतला भात लावणीचा आनंद
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ११ : ‘बांधावरची शाळा करूया, बांधावरची शाळा, हिरव्या हिरव्या हिरवाईचा, फुलवू शेतमळा’ असे गीत गुणगुणत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नडगिवे क्रमांक १ प्रशालेतील मुलांनी जिल्हा परिषद सिंधुदुर्गचा पर्यावरणाशी नाळ जोडणारा व शेतीतील कामांची ओळख शालेय विद्यार्थ्यांना करून देणारा नाविन्यपूर्ण असा ''बांधावरची शाळा'' उपक्रम आनंदमय, उत्साहापूर्ण वातावरणात केला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतीश कर्ले, मुख्याध्यापिका अनिता पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली नडगिवे येथील शेतकरी अजित गुंडये यांच्या शेतात हा उपक्रम हा उपक्रम राबविला. अर्चिता गुंडये यांनी सर्वांचे स्वागत केले. तरवा काढणे, नांगरणी करणे, चिखल करणे, मेर बांधणे, पेंढी धुणे, लावणी करणे यांसारख्या विविध कामांचा प्रत्यक्ष अनुभव मुलांनी घेतला. गुंडये यांच्याशी शेतीसंबंधी संवाद साधला. शेतात उखाणी व गाणे गात मुलांनी बळिराजाला मदत केली. या उपक्रमात शिक्षक प्रभा अकिवाटे, संदीप कदम, श्रीम. कासले यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: वैभव सूर्यवंशीला आयपीएल सुरू होण्यापूर्वी कॅप्टन रियान परागचा सल्ला; म्हणाला, त्यांच्यापासून दूर राहा...

हॉटेल-ढाब्यांसाठी नवा स्वयंपाकाचा पर्याय! मुंबईत ‘देश का इंधन’ बायोफ्यूल कोल प्रणालीची एंट्री; नवे तंत्रज्ञान नेमकं आहे तरी कसं?

Haveli News : हवेली तालुक्यात गॅस बुकिंगवरील ग्रामीण-शहरी भेदाविरुद्ध संताप; २५ दिवसांचा नियम लागू करण्याची मागणी

Solapur News : माढा तालुक्यात गारपीट; द्राक्षे-आंबा पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल

Gold Price Target 2026: सोनं दीड लाखांच्या खाली! १ लाख ४० हजारांपर्यंत येण्याची दाट शक्यता; तज्ज्ञ काय सांगतात? खरेदीची योग्य वेळ कोणती?

SCROLL FOR NEXT